विद्युत भवनात उभारला ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 06:34 PM2019-07-31T18:34:29+5:302019-07-31T18:34:37+5:30
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या येथील विद्युत भवनच्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला असून, बुधवारी या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते करण्यात आले.
अकोला : महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या येथील विद्युत भवनच्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला असून, बुधवारी या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते करण्यात आले.
निसर्ग व पर्यावरणाच्या समतोलासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्युत भवन येथे रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प उभारून अकोला परिमंडळाने सामाजिक जबाबदारी स्विकारल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी याप्रसंगी केले.
या रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्पामुळे महावितरणच्या विद्युत भवनात असलेली जुनी अंदाजे ४०० स्क्वेअर फूट असलेल्या विहिरीत या प्रकल्पातून विद्युत भवन या कार्यालयाच्या छतावर पडणारे पावसाळ्याचे पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे दरवर्षी सरासरी ६ लाख ३५ हजार लिटर पाणी या विहिरीत जमा होणार असल्याने या विहिरीचीच नाही तर आजुबाजूच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होणार आहे. अकोला जिल्ह्यात पर्यावरणीय स्थिती आणि पडणारे७६० मिलीलिटर एवढे पर्जन्यमान बघता रेन वॉटर हार्वेस्टींग ही काळाची गरज असल्याचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी सांगीतले. यावेळी त्यांनी हा प्रकल्प उभारणाऱ्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता नारायण लोखंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनोज नितनवरे व त्यांच्या चमूचा पुष्प देऊन गौरव केला.
यावेळी उप विधी अधिकारी सुनील उपाध्ये, सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागुल, प्रणाली विश्लेषक राजेश दाभणे, वरिष्ठ व्यवस्थापक सुमित बोधी उपस्थित होते. महावितरण अकोला परिमंडळाने कायम स्वच्छतेला प्राधान्य देत कर्मचाº्यांसाठी आरओ प्लांटच्या माध्यमातून शुध्द पाण्याची याअगोदरच व्यवस्था केली आहे.