कापशी येथे पावसाचे पाणी घरात शिरले; पिकांची अपरिमित हानी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:10+5:302021-07-23T04:13:10+5:30
बुधवारी रात्री ८ वाजेपासून मध्यरात्रीनंतर धो धो पाऊस बरसला. कापशीनजीकच्या वाघाडी नाल्याला मोठा पूर आला. त्यामुळे कापशी रोड गावात ...
बुधवारी रात्री ८ वाजेपासून मध्यरात्रीनंतर धो धो पाऊस बरसला. कापशीनजीकच्या वाघाडी नाल्याला मोठा पूर आला. त्यामुळे कापशी रोड गावात सुमारे पाच तास पाणी तुंबले होते. तुंबलेल्या पाण्याला जाण्यासाठी वाट नसल्याने कापशी रोडवरील ३०हून अधिक घरांत पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. घरांतील धान्याचे नुकसान झाले आहे. रुस्तम शिरसाट, कविता शिंदे, त्रिगुणाबाई इंगळे, साहेबराव तायडे यांच्या घराच्या भिंती कोसळल्या.
फोटो:
५३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
कापशी रोड आणि कापशी तलाव या शेतशिवारातील ५३७ हेक्टर क्षेत्रापैकी ७० टक्के अधिक शेती पिकाचे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे शेतजमीन खरडून गेली आहे. शेतातील पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी किरण जायले, कृषी सहाय्यक नागे, ग्रामसेवक योगेश देशमुख नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करत आहे.
मदत देण्याची मागणी
अतिवृष्टीमुळे घरात पाणी घुसलेल्या नागरिकांना प्रत्येकी पाच हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. त्याबरोबरच घराच्या भिंती पडलेल्यांना तातडीने घरकूल मंजूर करावी. शेतमाल, शेतपिकाच्या नुकसानीपोटी तातडीने हेक्टरी दहा हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. त्याबरोबरच सर्वेक्षणानुसार आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.