पावसाचे पाणी अनेक घरात शिरले; घरातील धान्य भिजल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 07:56 PM2021-06-10T19:56:01+5:302021-06-10T19:56:25+5:30
Murtijapur News : निंभा येथील काही घरात पावसाचे पाणी शिरल्याने घरातील धान्य व गुरांसाठी चारा म्हणून साठवून ठेवलेले कुटार भिजल्याने नुकसान झाले.
मूर्तिजापूर : तालुक्यात गुरुवारी पहिल्याच पावसाने हजरी लावल्याने निंभा येथील काही घरात पावसाचे पाणी शिरल्याने घरातील धान्य व गुरांसाठी चारा म्हणून साठवून ठेवलेले कुटार भिजल्याने नुकसान झाले.
तालुक्यातील एकाएकी सतत दीड तास आलेल्या पावसाने नागरीकांची तारांबळ उडाली, यात हेवेचाही जोर असल्याने तालुक्यातील अनेक गावात किरकोळ नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. झालेल्या जोरदार पावसाने शेतात पाणी साचले असून शेते तुडूंब झाली होती. विशेष म्हणजे तालुक्यातील निंभा येथे गावा लगत असलेल्या नाल्याला मोठा पुर आल्याने पुराचे पाणी काही घरात शिरून धान्याचे नुकसान झाले. दुपारी ३ वाजता पासून पावसाला सुरुवात झाली दीड तास जोरात पाऊस झाला. गोविंदराव सुलताने यांच्या घरात निंभा ते कमलखेड या रोड ने आलेल्या नाल्याचे पाणी शिरून २ पोते गहू व पेरणी साठी आणी डाळ तयार करण्यासाठी साठी ठेवलेली २ पोते तुर व
जनावरांसाठी साठवून ठेवलेले कुटार पाण्यात भिजले. संतोष सदाफळे, प्रमोद पांडे यांचे सुद्धा त्याच बाजूला घर असल्यामुळे त्यांच्या घरात पाणी शिरले. किनखेड ते निंभा या रोड वरील गावाला लागून असलेला नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नाल्या शेजारचे सर्व शेत पुरात डुबलेले होते.