राज-राजेश्वराला भाविकांची अलोट गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:05 AM2017-08-01T02:05:57+5:302017-08-01T02:06:33+5:30
अकोला: शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील दुसºया सोमवारीही भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली; तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषेक करू न महादेवाला पुजले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील दुसºया सोमवारीही भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली; तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषेक करू न महादेवाला पुजले.
३१ जुलै रोजी श्रावण मासातील दुसरा सोमवार आला. दुसºया सोमवारची शिवमूठ तीळ असल्याने महिला भक्तांनी महादेवाच्या पिंडीवर तीळमूठ अर्पण करू न मनोभावे पूजा केली.
मंदिरच्या बाहेरिल परिसरात यात्रा भरली होती. जुना भाजीबाजार ते असदगड किल्ल्यापर्यंत किरकोळ विक्रेत्यांनी तसेच लघु व्यावसायिकांनी विविध गृहपयोगी वस्तू व खेळण्यांची दुकाने थाटली, तसेच खाद्यपदार्थ विक्रीचेही दुकाने यात्रेत होती. साबुदाणा वडा, साबुदाणा उसळ, बटाटे चिप्स, गुळपट्टी भाविकांसाठी उपलब्ध होती.
तगडा पोलीस बंदोबस्त
भाविकांची अलोट गर्दी बघता, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त केला. श्वानपथकही तैनात करण्यात आले होते.
पुढल्या सोमवारी चंद्रग्रहण
७ आॅगस्ट रोजी श्रावण मासातील तिसरा सोमवार येत आहे. यादिवशी चंद्रग्रहण आहे. याकरिता दुपारी १२ ते रात्री १ वाजेपर्यंत मंदिराच्या गाभाºयाची दारे बंद राहणार असल्याची सूचना मंदिर व्यवस्थापनाने दिली आहे.
मंदिर मार्गावर खड्डे
जयहिंद चौक ते किल्ला चौकापर्यंतच्या मार्गाची दुरवस्था झाली आहे. भाविक, कावडधारी यांना या मार्गानेच राजेश्वर मंदिरात यावे लागते. मार्गावर मोठे खड्डे पडले असल्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.