राजेंद्र सोनोने ‘गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये!

By admin | Published: December 14, 2015 02:34 AM2015-12-14T02:34:27+5:302015-12-14T02:34:27+5:30

कास पठार हाफ मॅराथॉन स्पर्धेत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि डॉ. राजेंद्र सोनोने यांचा सहभाग.

Rajendra Sonone 'Guinness Book of World Records'! | राजेंद्र सोनोने ‘गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये!

राजेंद्र सोनोने ‘गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये!

Next

अकोला : जागतिक दर्जाच्या सातारा ते कास पठार, या हाफ मॅराथॉन स्पर्धेत अकोल्यातील डॉ. राजेंद्र सोनोने आणि अकोल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला असून त्यांचे नाव गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले. सातारा येथे २ सप्टेंबर २0१५ रोजी हाफ मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. सातारा ते कास पठार हा २१ कि.मी.चा चढ असून, जगातील खडतर मार्गापैकी एक आहे. यामध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि डॉ. राजेंद्र सोनोने यांचाही सहभाग होता. त्यांनी हा चढ दिलेल्या कालावधीत चढल्याने त्यांचे नाव गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले.

Web Title: Rajendra Sonone 'Guinness Book of World Records'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.