राजेश भारती यांनी जाहीर केली उमेदवारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:29 AM2017-09-27T01:29:49+5:302017-09-27T01:32:34+5:30
अकोला : पक्षाच्या धोरणानुसार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात होणे क्रमप्राप्त होते.मात्र ही प्रक्रिया लांबली. आ.राजेशकुमार यांनी सायंकाळ पर्यत विविध नेत्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली यावेळी राजेश भारती यांना अध्यक्षपदासाठी आठ नगरसेवकांसह सर्वाधीक पदाधिकार्यांनी पसंती दिली. यावेळी भारती यांनी मी निवडणूक लढविण्यास तयार आहे असे स्पष्ट करीत स्व:ताची उमेदवारी जाहिर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

या बैठकीमध्ये काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड यांनीसुद्धा कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचा आग्रह जिल्हा निवडणुक अधिकारी आ. राजेशकुमार यांच्याकडे धरला. भरगड यांनी सांगितले की, पक्षामध्ये पदांवर ठाण मांडून बसणार्या काही निष्क्रिय पदाधिकार्यांमुळे संघटना कमकुवत झाली आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी काही पदाधिकार्यांनी पक्षाची नितीमत्ता गहाण ठेवल्यामुळे पक्षाचे अतोनात नुकसान झाल्याचा आरोप केला. ‘ज्यांच्या मनात चोर असेल तो निवडणुकीला सामोरे जाण्यास घाबरणार’ असे नमूद करीत भरगड यांनी निवडणूक घेण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला राजेश भारती यांनी अनुमोदन दिले.
काय म्हणाले पदाधिकारी?
पदाधिकार्यांची निवड मतदानाच्या माध्यमातून व्हावी, अशी राहुल गांधी यांची भूमिका असून, या विषयी त्यांचे स्पष्ट निर्देश असल्याचे मत राजेश भारती यांनी व्यक्त केले. पक्षात गटबाजीला उधाण आले असून, महानगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्यांनी आधी एक होण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या माध्यमातून पदाधिकार्याची निवड व्हावी, त्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करावा, असे मत नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी मांडले. माजी महापौर सुरेश पाटील, सीमा ठाकरे यांनीसुद्धा निवडणुकीचा आग्रह लावून धरला.
हम भी मन की बात कर ले!
निवडणुकीसाठी पदाधिकारी आग्रही असल्याचे ध्यानात आल्यानंतर पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा आ. राजेश कुमार यांनी उपस्थित पदाधिकार्यांसोबत खासगीत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘मोदी कि तरह हम भी मन की बात कर ले’ असे म्हणत त्यांनी बैठक गुंडाळली.
आज जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी बैठक
आमदार राजेशकुमार हे दोन दिवसांच्या दौर्यावर आले असून बुधवारी अकोला जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदासाठी स्थानिक स्वराज्य भवन येथे पदाधिकार्यांसोबत संवाद साधणार आहेत.