अकोला मार्गे राजकोट-मेहबूबनगर समर स्पेशल एक्स्प्रेस सोमवारपासून
By Atul.jaiswal | Published: April 14, 2024 04:38 PM2024-04-14T16:38:35+5:302024-04-14T16:38:47+5:30
आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या एक्स्प्रेस गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.
अकोला: उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने गुजरात राज्यातील राजकोट ते तेलंगणा राज्यातील मेहबूबनगर या दोन शहरांदरम्यान १५ एप्रिल ते २४ जून या कालावधीत उन्हाळी विशेष साप्ताहिक रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या एक्स्प्रेस गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०९५७५ राजकोट-मेहबूबनगर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १५ एप्रिल ते २४ जून या कालावधीत दर सोमवारी राजकोट स्थानकावरून दुपारी १३:४५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ७:५० वाजता अकोला स्थानकावर आल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी १९:३५ वाजता मेहबूबनगर स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवावसात ०९५७६ मेहबूबनगर-राजकोट साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १६ एप्रिल ते २५ जून या कालावधीत दर मंगळवारी रात्री २१:३५ वाजता रवाना होऊन बुधवारी ११:०५ वाजता अकोला स्थानकावर आल्यानंतर गुरुवारी पहाटे ०५:०० वाजता राजकोट स्थानकावर पोहोचणार आहे.
या ठिकाणी राहिल थांबा
अप व डाऊन या मार्गावरील या विशेष एक्स्प्रेसला वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नाडियाद, आनंद, वडोदरा, सुरत, नंदुरबार, जळगाव, भूसावळ, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेढचल, काचिगुडा, शादनगर, जडचर्ला या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.