चित्रपटगृह मालकांना राजपूत समाजाचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:48 AM2017-11-14T01:48:11+5:302017-11-14T01:48:28+5:30

शहरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा राजपूत समाजाच्यावतीने शहरातील चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना देण्यात आला.

Rajput community ultimatum to the cinematographer | चित्रपटगृह मालकांना राजपूत समाजाचा अल्टीमेटम

चित्रपटगृह मालकांना राजपूत समाजाचा अल्टीमेटम

googlenewsNext
ठळक मुद्देराणी पद्मावती चित्रपटात शहरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केल्यास गंभीर पडसादआमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया यांना निवेदन


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राणी पद्मावती चित्रपटात हिंदू संस्कृती व स्त्रियांचा अपमान करण्यात आल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचण्याची दाट शक्यता आहे. शहरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा राजपूत समाजाच्यावतीने शहरातील चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना देण्यात आला. तसेच आमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया यांना निवेदन सादर करण्यात आले. 
आगामी १ डिसेंबर रोजी देशभरात प्रसिद्ध होणार्‍या राणी पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला राजपूत तसेच विविध हिंदू संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. राजपूत राणी पद्मावती यांनी परकीय आक्रमणासमोर न झुकता अग्निकुंडात स्वत:ला जाळून देशासाठी बलिदान दिले. इतिहासातील तथ्य जाणून न घेता हिंदी चित्रपटसृष्टीने महापुरुषांच्या इतिहासाचे विकृ तीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. निर्माता संजय लीला भंसाळी यांनी तयार केलेल्या राणी पद्मावती चित्रपटात चुकीचा इतिहास साकारण्यात आल्याचा आरोप स्थानिक राजपूत समाजाने केला आहे. भारतीय संस्कृती तसेच इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे काम बॉलीवूडकडून होत आहे. 
या प्रकारामुळे हिंदू व राजपूत समाजाच्या भावनांना ठेच पोहोचणार असल्यामुळे स्थानिक चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा राजपूत समाजाच्यावतीने बादलसिंह ठाकूर, राजू ठाकूर, रघू ठाकूर, अजयसिंह ठाकूर, संजयसिंह सिसोदिया, अजयसिंह सेंगर, भोजराजसिंह बैस, सुमेरसिंह ठाकूर, कैलाससिंह राजपूत, आशिषसिंह ठाकूर, राहुल ठाकूर, अजयसिंह गौर, मनोज बिसेन, प्रदीपसिंह गौर, संदीप ठाकूर, विनोदसिंह ठाकूर, संजयसिंह चंदेल, उदयसिंह ठाकूर, सूरजसिंह ठाकूर, दिनेशसिंह ठाकूर, विकल्पसिंह ठाकूर, सुजीतसिंह ठाकू र, आकाश गौर, मनीष चव्हाण, विक्की ठाकूर, तेजसिंह ठाकूर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 
-

Web Title: Rajput community ultimatum to the cinematographer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.