राकेश टिकैत यांची अकोल्यातील किसान कैफियत शेतकरी महापंचायत रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:24 AM2021-02-17T04:24:30+5:302021-02-17T04:24:30+5:30
अकोल्यात २० फेब्रुवारी रोजी खुले नाट्यगृह येथे किसान कैफियत शेतकरी महापंचायत आयोजित करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी ...
अकोल्यात २० फेब्रुवारी रोजी खुले नाट्यगृह येथे किसान कैफियत शेतकरी महापंचायत आयोजित करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान विकास मंच, शेतकरी जागर मंच, कुणबी विकास मंडळ, नेहरू युवा परिवार आदी संघटनांतर्फे आयोजित या सभेला संबोधित करण्यासाठी राकेश टिकैत व युद्धवीर सिंह येणार होते. दरम्यान, अकोला जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने १६ फेब्रुवारीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. या आदेशानुसार सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर कडक प्रतिबंध लावण्यात आले. तसेच गर्दी करणारा कार्यक्रम आयोजित करू नये, असे जिल्हा प्रशासनाने शेतकरी जागर मंचास लेखी कळविले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत किसान कैफियत शेतकरी महापंचायत रद्द करण्यात आल्याचे शेतकरी जागर मंचाने मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये जाहीर केले. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर हा कार्यक्रम घेण्यात येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.