अनेक गावांत विजयी उमेदवारांची रॅली आणि फटाक्यांची आतषबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:21 AM2021-01-19T04:21:24+5:302021-01-19T04:21:24+5:30
निवडणूक निकाल गृहीत धरून प्रशासनाने जिल्ह्यात ३७ (१) (३) जारी केले असताना या कलमांचा अनेक ठिकाणी भंग करण्यात आला ...
निवडणूक निकाल गृहीत धरून प्रशासनाने जिल्ह्यात ३७ (१) (३) जारी केले असताना या कलमांचा अनेक ठिकाणी भंग करण्यात आला आहे. निवडणूक निकालानंतर निवडून आलेल्या उमेदवारांनी आपापल्या गावात जाऊन गावात मिरवणूक काढणे, गुलाल उधळणे, पराभूत उमेदवाराच्या घरासमोर जाऊन फटाके वाजवणे, नारेबाजी व घोषणाबाजी करणे आदी वर्तण केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. एका ठिकाणी जमाव करून कलम ३७ न जुमानता कायद्याचा भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार त्या त्या गावात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या समक्ष होत असताना त्या कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्या कायदा सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्यांविषयीच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या माध्यमातून विजयी उमेदवारांनी अनेक ठिकाणी सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व फोटो व्हायरल झाले आहेत. याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.