माना येथील रामनवमी उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:19 AM2021-04-20T04:19:36+5:302021-04-20T04:19:36+5:30
फोटो: गुटखा विक्रेत्याविरुद्ध हिवरखेड पोलिसांची कारवाई हिवरखेड : हिवरखेड पोलिसांनी रस्त्यावर गुटख्याची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या विठ्ठल नामक विक्रेत्याविरुद्ध कारवाई ...
फोटो:
गुटखा विक्रेत्याविरुद्ध हिवरखेड पोलिसांची कारवाई
हिवरखेड : हिवरखेड पोलिसांनी रस्त्यावर गुटख्याची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या विठ्ठल नामक विक्रेत्याविरुद्ध कारवाई करून त्याच्याकडील गुटख्याचा अवैध साठा जप्त केला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा गजाआड
मूर्तिजापूर : एका महापुरुषाबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून भावना दुखावणारा लाखपुरी येथील पवनसिंह मुंगोना (२४) याला मूर्तिजापूर पोलिसांनी अटक केली. गावात काहीकाळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी गावात पोहोचून ग्रामस्थांना शांत केले.
जीवनावश्यक वस्तू दर वाढले
पिंजर : लॉकडाऊनमुळे पिंजर परिसरातील कामधंदे ठप्प झाले आहेत. मजुरांना कामे मिळत नाही. शेतातील कामे बंद आहेत. अशातच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. व्यापारी लॉकडाऊनचे कारण पुढे करून जीवनावश्यक वस्तू दुपटीच्या दराने विकत आहेत. याविरुद्ध अन्न प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
देवरी येथील पंचमुखी महादेव यात्रा रद्द
अकोट : अकोट तालुक्यातील देवरी येथील पंचमुखी महादेव संस्थान येथील २३ ते २५ एप्रिलदरम्यान होणारा यात्रा महोत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे यंदा यात्रा महोत्सव होणार नाही. भाविकांनी देवरी येथे येऊन गर्दी करून असे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.
वाडेगाव पोलीस चौकी परिसरात वृक्षारोपण
वाडेगाव : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाडेगाव पोलीस चौकी परिसरात पीएसआय मनोज वासाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच सुनील घाटाेळ, प्रकाश कंडारकर, प्रशांत मानकर, बळीराम घाटोळ, पंचायत समिती गटनेता अफसर खान उपस्थित होते.
दारूसाठी पैसे न दिल्याने शिवीगाळ
तेल्हारा : आडसूळ येथील फिर्यादीच्या घरी जाऊन दारूसाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद होऊन शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. दिगंबर अरबट यांच्या तक्रारीनुसार तेल्हारा पोलिसांनी आरोपी शांताराम काशीराम चिकटे याच्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल केला.
मिनारा मशिदीमध्ये कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती
बार्शीटाकळी : येथील मिनारा मशिदीमध्ये जि.प. सीईओ सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे प्रवक्ता सै. जव्वाद हुसैन, नईम फराज, मुख्याध्यापक शफीक राही, राजु कुरेशी कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती केली. यावेळी जमिअते उलेमाचे तालुकाध्यक्ष मौलाना अबुल सलाम, मौलाना अजीज उल्लाह उपस्थित होते.
पांडुरंग बाबा महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम
पातूर : सुप्रसिद्ध आराध्य दैवत पांडुरंग बाबा महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम रविवारी पार पडला. कार्यक्रमाला शंकर गाडगे, गजानन गाडगे, दीपक हिरळकार, गजानन पाटील, संतोष पाटील, रामदास गाडगे, नितीन गाडगे आदी उपस्थित होते.
अडगाव बु. येथे संचारबंदीचे उल्लंघन
अडगाव बु.: शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली. परंतु अडगाव बु. येथे संचारबंदीकडे दुर्लक्ष करून सर्वकाही सुरळीत आहे. कुठेही संचारबंदी असल्याचे दिसत नाही. मुख्य चौकासह घाना चौकात नागरिक विना मास्क फिरताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पिंजर पोलिसांकडून वाहनांची तपासणी
पिंजर : विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांविरूद्ध पिंजर पोलिसांनी रविवारी कारवाई करून दंड वसूल केला. सोबतच पोलिसांनी वाहनांची तपासणी केली. ठाणेदार महादेव पडघान यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी कारवाई करीत आहेत. पोलिसांनी रविवारी ३२०० रुपये दंड वसूल केला.