पुलावरील कठडे गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:20+5:302021-07-24T04:13:20+5:30
पाणी ओसरले! अकोला : शहरातील मेहरे शनगर, गुरुदत्तनगर, आश्रयनगर भागातील बहुतांश घरात पावसामुळे पाणी घुसले होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत या ...
पाणी ओसरले!
अकोला : शहरातील मेहरे शनगर, गुरुदत्तनगर, आश्रयनगर भागातील बहुतांश घरात पावसामुळे पाणी घुसले होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत या भागातील पाणी ओसरले; मात्र घाण साफ करताना नागरिकांचे चांगलेच हाल झाले.
शुक्रवारी कोसळल्या सरी!
अकोला : जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. शहरातील नागरिकांना यामधून दिलासा मिळत नाही तोच शुक्रवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्या. गुरुवारी व शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १२ मिमी पाऊस झाला. आणखी काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कचऱ्यांचे ढिगारे घरात
अकोला : शहरातील घंटागाड्या सुरू असताना बहुतांश नागरिक हे नदी, नाल्यात कचरा टाकतात. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले. या पाण्यासोबत नदी, नाल्यामधील कचराही घरात आला.