‘रामू... समाजाला मी एकटाच डॉक्टर आहे!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 02:18 PM2017-10-01T14:18:28+5:302017-10-01T14:18:58+5:30
अकोला : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्यावतीने रविवारी अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त लहान उमरीतील भीमशक्ती युवक संघटनेच्यावतीने साकारण्यात आलेला ‘रामू... तुला जो आजार आहे, त्याचे हजारो डॉक्टर आहेत; पण, माझ्या समाजाला जो आजार आहे, त्याचा मी एकटाच डॉक्टर आहे! ’ हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्यातील संवादाचा देखावा आंबेडकरी अनुयायांसाठी चित्तवेधक ठरला.
. दसºयाच्या दुसºया दिवशी अकोल्यात होणाºया या धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभाला अकोला जिल्ह्यासह वाशिम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील आंबेडकरी बौद्ध उपासक-उपासिकांसह आंबेडकरी अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या पृष्ठभूमीवर कार्यक्रमाच्या ठिकाणी अकोल्यातील लहान उमरी येथील भीमशक्ती युवक संघटनेच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्यातील संवादाचा देखावा साकारण्यात आला आहे. एका झोपडीसमोरील खाटेवर रमाई विश्रांती करीत असून, त्यांच्या शेजारी डॉ. बाबासाहेब बसले आहेत. स्वत:कडे आणि कुटुंबाकडे लक्ष देण्याची कळवळून विनवणी रमाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना करीत आहेत. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रमाई यांना सांगतात ‘रामू... तुला जो आजार आहे, त्याचे हजारो डॉक्टर आहेत. पण, माझ्या समाजाला जो आजार आहे, त्याचा मी एकटाच डॉक्टर आहे.’ बाबासाहेब आणि रमाई यांच्यातील ह्दयस्पर्शी संवादाचा मूर्तिकार अरुण मेसरे यांनी साकारलेला हा देखावा आंबेडकरी अनुययांचे चित्त वेधून घेणारा ठरला आहे.
‘भीमवाडी’तील झोपडीसमोर
साकारला संवाद!
भीमशक्ती युवक संघटनेच्यावतीने साकारण्यात आलेल्या ‘भीमवाडी’मध्ये बांबू, तट्टा व कवेलू आणि शेण-मातीने सारवलेल्या झोपडीसमोर डॉ. बाबासाहेब आणि रमाई यांच्यातील हा संवाद मूर्तिकाराने साकारला आहे.