तेल्हारा येथे रानभाजी महोत्सव; तासाभरातच २७ हजारांची उलढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:23 AM2021-08-14T04:23:04+5:302021-08-14T04:23:04+5:30

तेल्हारा: तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आत्मा यांच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन येथील पंचायत ...

Ranbhaji Festival at Telhara; 27,000 turnover in an hour! | तेल्हारा येथे रानभाजी महोत्सव; तासाभरातच २७ हजारांची उलढाल!

तेल्हारा येथे रानभाजी महोत्सव; तासाभरातच २७ हजारांची उलढाल!

Next

तेल्हारा: तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आत्मा यांच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन येथील पंचायत समिती प्रांगणात करण्यात आले होते. या महोत्सवास तेल्हाराकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत, फक्त तासाभरातच सुमारे २७ हजार रुपयांची उलाढाल या महोत्सवात झाली.

या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे व उद्घाटक म्हणून उत्तम माधव नळकांडे गाडेगाव येथील देशी वृक्षलागवड करणारे निसर्गप्रेमी लाभले होते. रानभाज्या या मानवी शरीरात पोषण मूल्य वाढवणाऱ्या असून, त्यांचा मानवी आरोग्यावर चांगला परिणाम होतो. अशा भाज्या या पावसाळ्यात कुठल्याही प्रकारच्या बियाण्यांची लागवड न करता, तसेच कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी न करता, रानभाज्या आपोआप उगवतात. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी कोरोना महामारीत जगायचे असेल, तर आहार पद्धतीमध्ये बदल करून पारंपरिक रानभाज्या आहारात घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. निसर्गप्रेमी उत्तम नळकांडे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना निसर्गावर मात नाही, तर निसर्गाशी मैत्री करा, निसर्ग भरभरून देतो, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी नरेंद्र राठोड, गौरव राऊत आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, नीलेशकुमार नेमाडे, तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, कृषिमित्र आदी उपस्थित होते. महोत्सवाचे संचालन नीलेश नेमाडे यांनी, तर आभार मंडळ कृषी अधिकारी राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी विभागाचे सर्व कृषी सहायक गट सहायक यांनी परिश्रम घेतले.

-------------

या रानभाज्या केल्या खरेदी

आत्माअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक गट, तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी या महोत्सवात बाष्याचे कोम, फांदीची भाजी, केना, कुंजीर, अंबाडी, आंबट चुका, चिवळ इत्यादी रानभाज्या शहरातील रानभाज्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या. ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, रानभाज्या खरेदी केल्या.

Web Title: Ranbhaji Festival at Telhara; 27,000 turnover in an hour!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.