राणेंच्या पक्षाला पश्चिम वर्हाडात थारा नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:26 AM2017-10-02T01:26:00+5:302017-10-02T01:26:20+5:30
अकोला : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत रविवारी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्थापन करीत असल्याची घोषणा केली. त्यामुळे राणेंच्या पुढच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली असून, त्यांच्या पक्षात आता राज्यातील कोण-कोणते नेते सहभागी होतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत रविवारी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्थापन करीत असल्याची घोषणा केली. त्यामुळे राणेंच्या पुढच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली असून, त्यांच्या पक्षात आता राज्यातील कोण-कोणते नेते सहभागी होतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या पृष्ठभूमीवर पश्चिम वर्हाडातील काँग्रेसच्या वतरुळात चाच पणी केली असता, पक्षाचे नेते राणेंच्या पक्षाबाबत निश्चिंत असल्याचे जाणवले. काँग्रेसमधील कोणताही मोठा नेता व किंवा पदाधिकारीसुद्धा राणेंच्या मागे जाणार नाही व या पक्षाला पश्चिम वर्हाडात थार मिळणार नाही, असा आशावाद काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची स्थिती दमदार म्हणावी अशी नाही. वाशिममध्ये अमित झनक यांच्या रूपाने एका आमदारासह जिल्हा परिषद ताब्यात आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये फारसे प्रतिनिधित्व नाही. बुलडाण्यात राहुल बोंद्रे हे जिल्हाध्यक्ष व आमदार तसेच हर्षवर्धन सपकाळ हे अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस अन् आमदार, असे प्रभावी नेतृत्व असल्यामुळे काँग्रेस सदैव कार्यतर आहे.
आकड्यांच्या गणितात काँग्रेस जिल्हा परिषदेच्या सत्तेत नसली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा प्रभाव चांगलाच आहे.
मात्र, येथे आता भाजपाने मोठे आव्हान उभे केले आहे. अकोल्यात काँग्रेसची स्थिती अतिशय नाजुक आहे. पातूर नगर पालिकेचा अपवाद वगळला, तर काँग्रेसच्या ताब्यात प्रभावी असे एकही सत्ताकेंद्र नाही. विधानसभा व लोकसभेसाठी हा जिल्हा दोन दशकांपासूनच काँग्रेसमुक्त झाला आहे.
अशा स्थितीत नारायण राणे यांच्या पक्षाकडे काँग्रेसचे काही ‘नाराज’ नेते आकृष्ट होतील, अशी अटकळ बांधली जात आहे.
मात्र, राणे यांनी काँग्रेस सोडण्याच्या घोषणोपासून पक्ष स्थापनेच्या घोषणेपर्यंत अशा नाराजांच्या काहीही हालचाली दिसून आल्या नाहीत. राणे सर्मथक म्हणविल्या जाणारे नेते आता दुसर्या पक्षात स्थिरावले असल्याने तेथील पद सोडून राणेंच्या मागे जाण्याचे धाडस कोण करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नारायण राणे यांच्या नव्या पक्षाचा काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही. पक्षसंघटनेच्या दृष्टीने काँग्रेसची बांधणी मजबूत असून, काँग्रेस विचारांचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राणेंच्या पक्षाला थारा नाही.
आ. राहुल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष बुलडाणा
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, त्यांनी नव्याने पक्ष स्थापन केला. आताच्या काळात नव्या पक्षाची वाटचाल खडतर ठरू शकते, अशा स्थिती काँग्रेसमधून राणेंच्या नव्या पक्षात कुणीही जाणार नाही.
-दिलीप सरनाईक, जिल्हाध्यक्ष वाशिम
राणेंचे सर्मथक म्हणून काँग्रेसमध्ये कुणी नाही, त्यांची आगामी वाटचाल ही भाजपाला पोषक अशी दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसला त्यांच्या नव्या पक्षाचा कोणताही फरक पडणार नाही.
- बबनराव चौधरी, अकोला काँग्रेस महानगर अध्यक्ष
राणे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा आपल्याकडे काहीच फरक पडणार नाही. त्यांच्याकडे कोणताही पदाधिकारी-कार्यकर्ता फिरकण्याचीही शक्यता नाही.
- हिदायत पटेल, जिल्हाध्यक्ष अकोला.