मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त पातुरात रंगली गीत, कवितांची मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:12 AM2021-02-05T06:12:21+5:302021-02-05T06:12:21+5:30
कार्यक्रमास उपाध्यक्ष अहेफाजोद्दीन, नगर परिषद मुख्याधिकारी सोनाली यादव, आरोग्य सभापती राजू उगले, महिला व बालकल्याण सभापती तुळसाबाई गाडगे, ...
कार्यक्रमास उपाध्यक्ष अहेफाजोद्दीन, नगर परिषद मुख्याधिकारी सोनाली यादव, आरोग्य सभापती राजू उगले, महिला व बालकल्याण सभापती तुळसाबाई गाडगे, वर्षा बगाडे, सभापती मोहम्मद फैज, प्रा. विलास राऊत, साहित्यिक देवानंद गहिले, किड्स पॅराडाईज अध्यक्ष गोपाल गाडगे, नगरपालिका अधीक्षक शिप्रा लोणारे, नगरपालिका प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख बी. पी. फलटणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पातूर नगरपरिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्यकला सादर केली तर किड्स पॅराडाईजच्या विद्यार्थ्यांनीही नृत्यकला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रा. विलास राऊत, देवीदास निलखन, अर्चना उगले, प्रा.करुणा गवई यांनी सुमधुर गीते सादर केली. एकापेक्षा एक सुरेख गीतांची मैफल यावेळी सादर करण्यात आली. या गीतांना संगीताची साथ प्रा. विलास राऊत यांच्यासह मंगेश राऊत, योगेश सुगंधी, प्रवीण राऊत आदींनी केली.
त्यानंतर मराठीविषयी अभिमान आणि गौरव वाढविणाऱ्या कविता सादर केल्या. अशोकराव दशमुखे, प्रकाश खटे, डॉ. शांतीलाल चव्हाण, देवानंद गहिले, कृष्णराव घाडगे, नारायणराव अंधारे, प्रा. विठोबा गवई, प्रा.मुकुंद कवळकार ,संजय नेमाडे, स्वाती जोशी, संजय गावंडे, नंदकुमार ठक, भारती गाडगे आदींनी बहारदार कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविक केंद्रप्रमुख बी .पी. फलटणकर तर सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. करुणा गवई यांनी केले. तर गोपाल गाडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगर परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक नारायण झाडोकार ,भीमराव कोथळकर, चंद्रकांत अंधारे, स्वाती गाडगे, अनिता तंबाखे, आशामती जाधव, दीपक सुरवाडे ,संतोष तेलंगडे, ऐनुद्दीन , देवेंद्र ढोणे, शालिनी ठक ,अशफाक भाई ,फुलारी , मानमोडे आदींसह मान्यवर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो: