तीन सुपरफास्ट विशेष गाड्यांचा पल्ला डिसेंबरपर्यंत वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:19 AM2021-09-19T04:19:52+5:302021-09-19T04:19:52+5:30

०२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया द्विसाप्ताहिक विशेष या गाडीला २ जानेवारी, २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ०२८१२ हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस ...

The range of three superfast special trains increased till December | तीन सुपरफास्ट विशेष गाड्यांचा पल्ला डिसेंबरपर्यंत वाढला

तीन सुपरफास्ट विशेष गाड्यांचा पल्ला डिसेंबरपर्यंत वाढला

Next

०२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया द्विसाप्ताहिक विशेष या गाडीला २ जानेवारी, २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ०२८१२ हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष ही गाडी ३१ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. ४ ऑक्टोबरपर्यंत मुदत असलेली ०२८१८ पुणे-संत्रागाची साप्ताहिक विशेष ही गाडी आता २७ डिसेंबरपर्यंत रुळावर धावणार आहे. ०२८१७ संत्रागाची-पुणे साप्ताहिक विशेष गाडीला २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाड्या सध्या धावत असलेल्या वेळेवरच धावणार असून, केवळ आरक्षित तिकिटांवरच या गाड्यांमधून प्रवास करता येणार आहे.

साईनगर शिर्डी - हावडा १ जानेवारीपर्यंत

९ ऑक्टोबरपर्यंत धावण्याची मुदत मिळालेली ०२५९३ साईनगर शिर्डी-हावडा साप्ताहिक विशेष ही गाडी आता १ जानेवारी, २०२२ पर्यंत या दोन स्थानकांदरम्यान विशेष गाडी म्हणून धावत राहणार आहे. ०२५९४ हावडा-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष या गाडीची मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत होती. ही गाडी आता ३० डिसेंबरपर्यंत धावणार आहे.

Web Title: The range of three superfast special trains increased till December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.