पंचायत समितीच्या मासिक सभेत रणकंदन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:23 AM2021-08-13T04:23:05+5:302021-08-13T04:23:05+5:30
येथील पंचायत समितीच्या म. फुले बचत भवनमध्ये पंचायत समिती सदस्यांची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभापती लक्ष्मी ...
येथील पंचायत समितीच्या म. फुले बचत भवनमध्ये पंचायत समिती सदस्यांची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभापती लक्ष्मी जनार्दन डाखोरे ह्या अध्यक्षस्थानी होत्या. या सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचन, जुलै २०२१ चा जमा खर्च मंजुरात, लेखा विभागातील लेखा विषयक नोंदवह्या, दलित वस्ती सुधार योजना सन २०२०-२१ अंतर्गत अखर्चित निधी बाबत, समिती उपकरामधील सन २०२०-२१ मधील अखर्चित निधीवर शासनाकडून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काबाबत, पंचायत समिती उपकर कृषी विभाग अंतर्गत प्लास्टिक ताडपत्री योजना अर्ज बोलावणे तसेच इतर विषयावर चर्चा करण्यात आली. सभेला सचिव म्हणून गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे, पं. स. सदस्य ॲड. सुरज झडपे, गोपाल ढोरे, शामराव ठाकरे, निमा राठोड, अर्चना डाबेराव व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दलित सुधार योजनेचा निधी परत गेल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे सभेत चांगलेच रणकंदन झाले.
या प्रकारानंतर दलित वस्ती सुधार योजना २०२०-२१ ला पंचायत समितीला केव्हा निधी प्राप्त झाला, त्यानुसार ग्रामपंचायतीला किंवा पत्रव्यवहार केला गेला, या कामाच्या ई निविदा बाबत ग्रामपंचायत स्तरावर काय कारवाई केली, या कामासाठी आलेला निधी किती वितरित केला, निवड केलेली कामे अपूर्ण राहण्याची कारणे काय व अखर्चित निधी केव्हा परत गेला, यासंदर्भात शासनाच्या काय मार्गदर्शक सूचना होत्या. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते अर्जुन टप्पे, अनिल राठोड हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे दाद मागणार असल्याचे कळते.
120821\img_20210812_174611.jpg
पंचायत समिती