पंदेकृविला मानांकनात ४८ वा क्रमांक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:59 AM2017-08-02T02:59:56+5:302017-08-02T03:02:25+5:30

अकोला : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा सर्वच अनुषंगाने दर्जा घसरला असून, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) मानांकनात ४८ वा क्रमांकावर राहील्याने विद्यापीठ व संबधीत यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

Ranked number 48 in number! | पंदेकृविला मानांकनात ४८ वा क्रमांक!

पंदेकृविला मानांकनात ४८ वा क्रमांक!

googlenewsNext
ठळक मुद्देदर्जा घसरला विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे व संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले!आज निघणार जाहिरात

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा सर्वच अनुषंगाने दर्जा घसरला असून, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) मानांकनात ४८ वा क्रमांकावर राहील्याने विद्यापीठ व संबधीत यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिस्विकृती समितीने राज्यातील कृषी विद्यापीठाचा आढावा यावर्षीच्या सुरू वातीलाच घेतला होता.आढाव्यात कृषी विद्यापीठांचे शिक्षण,संशोधन व विस्तार काम समाधानकारक दिसले नाही. म्हणूनच आयसीआरने या कृषी विद्यापीठांची अधिस्विकृती रद्द केली होती. त्याचे चांगलेच पडसाद उमटले होते. ही अधिस्विकृती हटवून कृषी विद्यापीठांना संशोधनासाठीचा निधी मिळावा,यासाठीचे प्रयत्न शासनाकरवी करण्यात आले. 
२0१४ पर्यंत राज्यात खासगी कृषी महाविद्यालयांची संख्या भरमसाठी वाढली पण कृषी विद्यापीठांची संचालक,विभागप्रमुख, प्राध्यापक आदी अध्र्यांच्यावर पदे रिक्त होती. शासनाने रिक्त पदेच न भरल्याने शिक्षण, संशोधन व कृषी विस्तार कार्यांचा ताण हा अपूर्‍या मणुष्यबळावर पडला. कृषी विद्यापीठाचे शासकीय महाविद्यालय तसेच खासगी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, उत्तर पत्रिका तपासणी आदी अतिरिक्त कामे करावी लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळली, संशोधनावरही परिणाम झाले. आयसीएआरच्या अधिस्विकृती समितीला हे सर्व ठळकपणे दिसले. त्याचाच परिणाम समोर आला असून, राज्यातील कृषी विद्यापीठांचा दर्जा घसरला आहे. परिणामी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रचंड मागे पडले असून, ‘टॉप टेन’ मध्ये राहणारे हे विद्यापीठ मानाकंनात ४८ व्या क्रमाकांवर पोहोचले आहे.
दरम्यान, गत दोन वर्षांत राज्यातील कृषी विद्यापीठांची जवळपास सर्वच रिक्त पदे भरण्यात आली आहे. खासगी ‘क’ व ‘ड’ श्रेणीतील महाविद्यालयावरही कारवाईचा बडगा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीएईआर)   उगारल्याने यात सुधारणा होत असल्याचा दावा एमसीएईआरव्दारे केला जात आहे. संचालक, विभाग प्रमुख,प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहायकांची पदे भरण्यात आली आहेत. 
त्यामुळे याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे कृषी विद्यापीठाचे म्हणने आहे.

आज निघणार जाहिरात
दरम्यान कृषी विद्यापीठाची सहयोगी अधिष्ठाता पदे भरण्यासाठी बुधवारी जाहिरात निघणार असल्याचे वृत्त आहे.

आयसीएआरच्या अधिस्विकृती समितीने सात ते आठ वर्षांनंतर आढावा घेतला होता. आता कृषी विद्यापीठांची जवळपास पदे भरण्यात आली असून, खासगी महाविद्यालयाच्या दर्जातही सुधारणा होत आहे. आता जर अधिस्विकृती समिती आली तर आपला दर्जा व क्रमांक सुधारलेला दिसणार आहे.
- डॉ.राम खर्चे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद,पुणे.

Web Title: Ranked number 48 in number!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.