लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2017 01:27 AM2017-07-14T01:27:10+5:302017-07-14T01:27:10+5:30

पहिली पत्नी असताना युवतीशी संबंध; युवतीलाही झाली दोन मुले

Rape by marriage bait | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जळगाव खान्देश जिल्ह्यातील म्हैसांगवी येथील रहिवासी एका इसमाने पहिली पत्नी असताना शहाबाद येथील एका युवतीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर रेल्वे क्वॉर्टरमध्ये बलात्कार केल्याची घटना २०११ मध्ये घडली. त्यानंतर वारंवार शारीरीक संबंध ठेवल्याने या युवतीला एक मुलगा व मुलगी झाली असून, युवतीच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील अशोक तायडे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हैसांगवी येथील रहिवासी अशोक मुरलीधर तायडे हा अकोल्यातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रेल्वे क्वॉर्टरमध्ये मित्राकडे राहावयास आला होता. या ठिकाणी शहाबाद येथील २२ वर्षीय युवती तिच्या मावस बहिणीकडे रहिवासी होती. अशोक तायडे याने २०११ मध्ये या युवतीशी बलात्कार केला. त्यानंतर युवतीने आरडाओरड केली असता, तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या गावी म्हैसांगवी येथे युवतीला घेऊन गेला.
या ठिकाणी सदर युवतीचे शारीरिक शोषण केले. यामध्ये युवती गर्भवती झाल्यानंतर तिला एक मुलगा आणि त्यानंतर पुन्हा एक मुलगी झाली.
युवतीने त्याला लग्नाची मागणी केली असता, त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सदर युवतीने अकोला गाठून या इसमाविरुद्ध बलात्कार, फसवणूक व अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी अशोक तायडे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४१७, ४७१, ३७६ आणि ३७७ सह पॉस्को अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पॅन कार्ड, आधार कार्ड बनावट बनविले!
अशोक तायडे याने सदर युवतीचे नाव वापरून पॅन कार्ड व आधार कार्डही बनविले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामध्ये अशोक तायडे याने आधार कार्ड व पॅन कार्डवर नाव युवतीचे ठेवले तर छायाचित्र त्याच्या पहिल्या पत्नीचे लावले आहे. अशी तक्रारही या युवतीने ठाण्यात दिली असून, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू के ली आहे.

Web Title: Rape by marriage bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.