अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस दहा वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 06:35 PM2019-02-06T18:35:01+5:302019-02-06T18:35:10+5:30
अकोला - जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरातील एका १२ वर्षीय मुलावर सार्वजनीक शौचालयामध्ये अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या न्यायालयाने बुधवारी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
अकोला - जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरातील एका १२ वर्षीय मुलावर सार्वजनीक शौचालयामध्ये अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या न्यायालयाने बुधवारी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच २७ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
वाशिम बायपास परिसरातील रहिवासी एक १२ वर्षीय मुलगा २४ एप्रिल २०१८ रोजी घराजवळ खेळत असतांना याच परिसरातील सिध्दार्थवाडीयेथील रहिवासी गजानन कीसन अर्दळे याने मुलाला विविध आमीष देउन सार्वजनीक शौचालयामध्ये नेले. त्यानंतर सदर मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. कु णालाही सांगीतल्यास जिवे मारण्याची धमक ी दिली. त्यामूळे मुलगा घाबरलेल्या अवस्थेतच घरी गेला मात्र त्याच्या कुटुंबीयांनी मुलाची अवस्था ओळखली आणि या घटनेची तक्रार जुने शहर पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपी गजानन अर्दळे विरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७, ३२३, आणि पोक्सो कायद्याच्या कलम ७,८,९, १० आणि ११ व १२ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर जुने शहर पोलिसांनी या घटनेचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजुचे १५ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी गजानन आर्दळे याला दोषी ठरवीत भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३ अन्वये एक वर्ष शिक्षा दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्यांची आणखी शिक्षा, ३७७ अन्वये १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पोक्सो कायद्याच्या कलम ७ आणि ८ अन्वये ५ वर्षांची शिक्षा ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांच्या शिक्षा याच कायद्याच्या कलम ९,१० अन्वये ५ वर्षांची शिक्षा ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी दोन महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ११ आणि १२ अन्वये ३ वर्षांची शिक्षा ३ वर्ष शिक्षा ५ हजार दंड आणि दंड न भरल्यास आणखी दोन महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले. एकून २७ हजार रुपयांचा दंड आरोपीस ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अॅड. मंगला पांडे यांनी कामकाज पाहीले.