अल्पवयीन मुलीवर अत्याचार; युवकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:11 IST2019-08-23T14:11:53+5:302019-08-23T14:11:57+5:30
चान्नी पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; युवकास अटक
खेट्री : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील १७ वर्षीय मुलीवर गावातील युवकाने लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केल्याची घटना २१ आॅगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
१७ वर्षीय मुलीला गावातील सागर गिºहे याने लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केला, तसेच लग्न करण्यास नकार देऊन मुलीची फसवणूक केली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने २१ आॅगस्ट रोजीच्या सायंकाळी थेट चान्नी पोलिसांत धाव घेऊन रीतसर तक्रार दिली. मुलीच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी सागर गिºहे याच्याविरुद्ध २१ आॅगस्ट रोजी रात्री बलात्कार आणि पास्कोचा गुन्हा दाखल केला आहे. २२ आॅगस्ट रोजी आरोपीला अटक करण्यात आली असून, २३ आॅगस्ट रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येईल. पुढील तपास ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रामराव राठोड व त्यांचे सहकारी अमोल कांबळे करीत आहेत. (वार्ताहर)