अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सावत्र वडिल गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 03:00 PM2019-11-09T15:00:52+5:302019-11-09T15:01:04+5:30
ती घरात एकटी असताना, तिचे सावत्र वडील घरात आले आणि त्यांनी धाकदपट करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
अकोला : सावत्र वडिलांनी पवित्र नात्याला काळिमा फासत, अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी अटक केली.
जुने शहरात एका भागात राहणाऱ्या १0 वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ती घरात एकटी असताना, तिचे सावत्र वडील घरात आले आणि त्यांनी धाकदपट करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती बाल संरक्षण अधिकारी करुणा महंतरे यांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांनी देत चौकशी केली. मुलीला ताब्यात घेतल्यावर मुलीने तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली. त्यानुसार जुने शहर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिच्या सावत्र पित्याविरुद्ध भादंवि कलम ३७६) अ, ब, क आणि पॉक्सोनुसार गुन्हा दाखल केला. शुक्रवारी दुपारी त्या नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली. शनिवारी नराधम पित्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)