काेराेनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:32 AM2020-12-13T04:32:44+5:302020-12-13T04:32:44+5:30
रेशन धान्याचा काळाबाजार ! पातूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या मोफत धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे ...
रेशन धान्याचा काळाबाजार !
पातूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या मोफत धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात अनेकांनी मका, तांदूळ काळाबाजारात विक्री केल्याचे दिसून येते. याची चाैकशी होणे गरजेचे आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा !
कुरूम : परिसरात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कोरोनाविषयी गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनाकडे ग्रामस्थ दुर्लक्ष करत आहेत.
कोरोनाविषयी गांभीर्य नाही; कारवाईची मागणी
अडगाव : वारंवार आवाहन करूनही अनेक ग्रामस्थ कोरोनाला गांभीर्याने घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे आहे. तसेच ही मोहीम सुरूच ठेवण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रेतीची अवैध वाहतूक सुरूच !
बाळापूर : तालुक्यात गत काही दिवसांपासून रेतीचे उत्खनन करून वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील रेती घाटांचा अजूनही लिलाव झालेला नाही. त्यामुळे, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.