राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार साहित्य संमेलन
By admin | Published: November 7, 2014 12:53 AM2014-11-07T00:53:14+5:302014-11-07T00:53:14+5:30
पूर्वतयारीनिमित्त पार पडला अकोला जिल्हा कार्यकर्ता मेळावा.
अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन १२ ते १४ डिसेंबरदरम्यान अकोल्यात आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रसंतांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजि त या साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी आकाशवाणीसमोरील जि.प. कर्मचारी भवनात जिल्हा कार्यकर्ता मेळावा पार पडला.
ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक अँड. रामसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला प्रा. हरिभाऊ गहूकर, शंकरराव देशमुख, गोवर्धन खोवले, तिमांडे महाराज, भाई प्रदीप देशमुख, स्वागताध्यक्ष डॉ. गजानन नारे, अमोल मिटकरी, सुभाष जैन, किशोर बंड, प्रा. यादव वक्ते, मंडाले दादा, अँड. सुधाकर खुमकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, सुशील वणवे, प्रा. उदय देशमुख, विजय अग्रवाल, जयंत मसने, विठ्ठलराव लोथे, डॉ. संतोष हुशे, प्रतिभा अवचार, अंबादास उगले, कृष्णा अंधारे, नंदकिशोर पाटील, अँड. विनोद साखरकर, शरद वानखडे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अँड. संतोष भोरे यांनी प्रास्ताविकातून साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कृषी मेळावा, महिला मेळावा, बालकांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भजन-कीर्तन व सामुदायिक ध्यान प्रार्थना आदि कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार पोहोचविण्याच्या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाददेखील मिळतो. विचार साहित्य संमेलनासाठी समितीच्यावतीने तयार करण्यात आलेली रूपरेषा उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केली. तसेच संमेलनाच्या दृष्टीने विविध समित्यांचे गठण, तालुका मेळाव्यांची तयारी, तालुका कार्यकारिणींचे गठण, तालुका दौरे निश्चित करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.