चेतनच्या स्वरांनी रसिक मोहित

By admin | Published: November 23, 2014 01:21 AM2014-11-23T01:21:47+5:302014-11-23T01:21:47+5:30

लोकमत सखी मंच व बाल विकास मंचची मैफल स्वरांची.

Rasik Mohit by the voice of Chetan | चेतनच्या स्वरांनी रसिक मोहित

चेतनच्या स्वरांनी रसिक मोहित

Next

अकोला : जो मंजिल चलते है वो शिकवा नही किया करते, जो शिकवा करते है वो मंजिल तक नही पहुचा करते सर्व काही व्यवस्थित असनूही आयुष्याचे रडगाणं गाणारे, थोड्याच्या अ पयशाने खचून जाणारे अनेकजण आपण सातत्याने पाहत असतो. परंतु जन्मजात डोळे नसलेल्या वाशिम जिल्ह्यातील केकतउमरा या छोट्याशा गावातीत चेतन उचितकर या बालकाने जेव्हा आपल्या स्वरांची वीण विणली तेव्हा अकोलेकर थक्क झाले. लोकमत सखी मंच, बाल विकास मंच, ऑर्बिट हॉस्पिटल व सांगलीवाला शोरूम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी प्रमिलाताई ओक हॉल येथे ह्यमैफल स्वरांचीह्ण हा अंध बालक चेतन उचितकर याच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अविनाश देशमुख, ऑर्बिट हॉस्पिटलचे चीफ अँडमिनीस्ट्रेटीव्ह ऑफीसर आर.पी. बोहरा, सांगलीवाल शोरूमचे संचालक विजय सॉव, नाईक होमिओ िक्लनिकच्या संचालिका भावना नाईक, शिवाजी महाविद्यालया तील संगीताचे प्राध्यापक विशाल कोरडे, लोकमतचे वरिष्ठ उपसं पादक सनथ आहाळे, इव्हेंट हेड प्रशांत पाटील व बाल कलावंत चेतन उचितकर उपस्थित होते. कार्यक्रमाचा आरंभ चेतनने गणेश वंदनेने केला. नन्हा मुन्ना राही हूं.., चॉकलेटचा बंगला.., छोडो कल की बाते.., फिरत्या चाका वरती देशील मातीला.., ए मेरे वतन के लोगो.., विठ्ठल नामाची शाळा भरली.. , चांदण चांदण.., हृदयी वसंत फुलतांना.. आदी गाण्यांचे सादरीकरण चेतन व त्याच्या सहकार्‍यांनी केले. राग भैरवी व राग बागेश्रीचे चेतनने केलेले सादरीकरण अप्रतिम असेच होते. विशेष म्हणजे चेतनला साथ देणारेदेखील अंधच कलावंत होते. ढोलकीवर अमोल गोडघासे, तबला कैलास पानबुडे, टाळ सिद्धार्थ उके, हार्मोनियम तुलसीदास व गायनात दुर्गा गवई यांनी साथ दिली. संचालन व आभार सखी मंच संयोजिका मीनाक्षी फिरके यांनी मानले.

Web Title: Rasik Mohit by the voice of Chetan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.