वैरणाचे दर कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 06:15 PM2019-04-02T18:15:06+5:302019-04-02T18:15:17+5:30
अकोला: विदर्भात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणाचा (कडबा पेंडी)दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत.
अकोला: विदर्भात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणाचा (कडबा पेंडी)दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. पशुधनाला लागणाºया हिरव्या चाºयाची गरज भागविण्यासाठी पिंपळ, सुबाभूळ, कडुनिंबाचा चाराही विकत घेण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे; पण या वैरणाचेही दर वाढले आहेत.
मागील वर्षी अल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन कमी झाले असून, त्याचसोबत चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात ज्वारी, कापूूस हे मुख्य पीक होते; परंतु अलीकडच्या काही वर्षांत या पिकाची जागा सोयाबीन पिकाने घेतल्याने विदर्भातील ही पारंपरिक पिके मागे पडली आहेत. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन घटल्याने पशुधनासाठी पोषक व आवश्यक कडबा कमी झाला. परिणामी, कडब्याचे दर प्रचंड वाढले असून, एका कडबा पेंडीचा दर ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर या कडब्यापासून तयार होेणाºया कुट्टीचा दर ८ ते १२ रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला आहे. ही कुट्टी मात्र ओली करू न पशुपालकांना विकली जात आहे.
यावर्षी तुरीच्या कुटाराचे दर तीन ते पाच रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले असून, सोयाबीनचे खाद्य (कुटार) जनावरे खात नसली तरी या कुटाराचा दर तीन रुपये किलो झाला आहे. हरभºयाचे कुटार पाच ते सात रुपये किलोपर्यंत गेले असून, सुबाभूळ, पिंंपळ, कडुनिंबाचा पाला दोन ते चार रुपये किलोने बाजारात विकला जात आहे. चाºयाचे दर प्रचंड वाढल्याने शेतकºयांना पशुधन अडचणीचे वाटत असून, वाटेल त्या दरात पशुधन विकण्यात येत आहेत. गव्हाचे कुटार (गव्हंंडा) जनावरे खात नाहीत. तथापि, या गव्हंड्याचे दरही वाढले.
- ज्वारीचे क्षेत्र घटले !
विदर्भातील एकट्या अकोला जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र एक लाख हेक्टरपर्यंत होते. तथापि, अलीकडच्या काही वर्षांमध्ये हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले असून, २०१८-१९ मध्ये १० ते १५ हजार हेक्टरपर्यंत पेरणी झाल्याने ज्वारीपासून मिळणाºया कडब्याचे दर वाढले.
- कडबा पेंडीचा दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शेतकºयांनी नवे तंत्रज्ञान वापरू न प्रथिनेयुक्त मूरघास तयार करण्याची गरज आहे. चाराटंचाईच्या या काळात गव्हंड्यावर मीठ, उसाची मळी टाकून चारा तयार करावा.
डॉ.आर.बी.घोराडे,
प्रमुख,
ज्वारी संशोधन केंद्र,
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.