काबुली हरभऱ्याला नऊ हजार रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:19 AM2021-04-22T04:19:06+5:302021-04-22T04:19:06+5:30

----------------------------------------------------- वन्य जिवांकडून पिकांची नासाडी अकोला : जंगलाला लागून असलेल्या शेतातील पिकांची वन्य जिवांकडून नासाडी केली जात आहे. टरबूज, ...

Rate of nine thousand rupees per gram | काबुली हरभऱ्याला नऊ हजार रुपये दर

काबुली हरभऱ्याला नऊ हजार रुपये दर

Next

-----------------------------------------------------

वन्य जिवांकडून पिकांची नासाडी

अकोला : जंगलाला लागून असलेल्या शेतातील पिकांची वन्य जिवांकडून नासाडी केली जात आहे. टरबूज, उन्हाळी मूग, तीळ ही पिके उद्ध्वस्त केली जात आहे. रोही, रानडुक्कर या वन्य जिवांची शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. आधीच विविध कारणांमुळे हवालदिल झालेला शेतकरी या नव्या संकटामुळे चिंतेत सापडला आहे.

-------------------------------------------------

ग्रामीण अर्थचक्र कोलमडले!

अकोला : गेल्या वर्षी कोरोनामुळे कोलमडलेला अर्थचक्राचा गाडा निदान यंदा तरी सुरळीत होईल असे वाटत असताना पुन्हा गेल्या वर्षीपेक्षाही भयाण परिस्थिती निर्माण झाल्याने सलग दुसऱ्या वर्षीही ग्रामीण अर्थचक्राची गाडी निराशेच्या गर्तेत अडकली असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याच्या मार्गावर आहे.

-------------------------------------------------

मास्क विक्री बनले उदरनिर्वाहाचे साधन

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मास्क लावणे अनिवार्य झाले आहे. हेच मास्क अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. शहरात ठिकठिकाणी मास्क विक्री होत आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई होत असल्याने मास्कची विक्री वाढली आहे.

------------------------------------------------

शीतपेयांची विक्री ठप्प!

अकोला : जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. यामध्ये शीतपेयांची विक्रीही ठप्प झाली आहे. उकाडा वाढत असला तरी कोरोनामुळे शीतपेये, आईस्क्रीम नागरिक टाळत आहे. व्यवसायावर परिणाम झाल्याने विक्रेतेही धास्तावले आहे.

Web Title: Rate of nine thousand rupees per gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.