तुरीचे दर गडगडले !
By admin | Published: January 4, 2016 02:42 AM2016-01-04T02:42:05+5:302016-01-04T02:42:05+5:30
तुरीचा हंगाम उरला पंधरा दिवसाचा.
अकोला : मागील दोन महिन्यापूर्वी गगणाला भिडलेले तुरीचे दर आजमितीस गडगडले असून, बाजारात सद्या तुरीला प्रतवारीनुसारी साडेसहा ते आठ हजार रू पयेपर्यत प्रतिक्विंटल दर मिळत आहे. एकीकडे तूर काढणीचा हंगाम संपत आला आहे आणि तुरीच्य दरात सारखी चढ उतार सुरू असल्याने शेतकर्यांना दरवाढीची प्रतिक्षा आहे. तूर पिकाबाबत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमाकांवर असून, लातूर, जळगाव, औरंगाबाद, मुंबई, अकोला व नागपूर महाराष्ट्रातील तुरीचे प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. मागीलवर्षी व मागील दोन तीन महिन्यापूवीं तुरीचे दर हे १0 ते १२ हजार रू पये प्रतिक्विंटलवर पोहोचल्याने शेतकर्यांनी या खरीप हंगामात तुरीच्या पेरणीत वाढ केली. पंरतु डिसेंबरमध्ये तूर काढणीचा हंगाम सुरू होताच बाजारातील तुरीचे दर १२ हजार रू पयाहून साडेसहा ते आठ हजार रू पये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले आहेत. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतवारी बघून साडेसहा हजार ते नऊ हजार रू पये प्रतिक्विंटलने तुरीची खरेदी केली जात आहे. दरम्यान, कापूस, सोयाबीन,मूग, उडीद पिकाचे उत्पादन यावर्षी कमी झाल्याने तूर साथ देईल अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. पंरतु तुरीच्या दरात आजमितीस ३ ते ४ हजार रू पये क्विंटलने घसरण झाली आहे. डॉ.पंदेकृविच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग व एन.ए.आय.पी. कृषी विपणन माहिती केंद्राच्या संशोधन चमूने लातूर बाजारपेठेतील मागील १६ वर्षांच्या कालावधीतील तुरीच्या किमतीचे मासिक सरासरी पृथ्थकरण करू न समतोल हवामानात तुरीला डिसेंबर २0१५ घ सरासरीच्या किमती जवळपास ७,५00 ते ८000 रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता वर्तविली होती. असे असले तरी देशातील तुरीचे अल्प उत्पादन व वाढलेले दर बघता चालू हंगामात तुरीचे १0 ते १२ हजार रू पये प्रतिक्विंटल दर टिकून राहतील शेतकर्यांनी अपेक्षा होती. पंरतु शेतकर्यांची निराशा झाली आहे.