फाटलेल्या शिधापत्रिकांचा घेणार लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 11:12 AM2020-02-04T11:12:46+5:302020-02-04T11:12:54+5:30

फाटलेल्या व जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.

Ration card will be audited in Akola district | फाटलेल्या शिधापत्रिकांचा घेणार लेखाजोखा!

फाटलेल्या शिधापत्रिकांचा घेणार लेखाजोखा!

Next

- संतोष येलकर

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यात फाटलेल्या व जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अन्न-धान्याच्या लाभासह विविध कामांसाठी महत्त्वाचा पुरावा म्हणून शिधापत्रिकेचा वापर करण्यात येतो; परंतु अनेक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिका फाटल्या आहेत, तसेच जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात फटलेल्या व जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेऊन, संबंधित लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नवीन शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी २ फेबु्रवारी रोजी जिल्हा पुरवठा विभागाला दिले. त्यानुसार जिल्ह्यात फाटलेल्या व जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. फाटलेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेण्याचे निर्देश ३ फेबु्रवारी रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील पुरवठा निरीक्षक व पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. फाटलेल्या शिधापत्रिकांची माहिती घेतल्यानंतर संबंधित शिधापत्रिकाधारकांना नवीन शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

योजनानिहाय जिल्ह्यात अशा आहेत शिधापत्रिका!
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यात एकूण ४ लाख १८ हजार २३ शिधापत्रिका आहेत. त्यामध्ये बीपीएल -८७ हजार ९५१, अंत्योदय योजनेंतर्गत - ४४ हजार ५५०, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत प्राधान्य गट - १ लाख ७ हजार ३११, शेतकरी -५० हजार ७२८, एपीएल (केशरी)-१ लाख ५हजार ३००, शुभ्र - २१ हजार ८३१ व अन्नपूर्णा योजनेंतर्गत- ३५२ शिधापत्रिकांचा समावेश आहे.

पालकमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात फाटलेल्या व जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेऊन, संबंधित शिधापत्रिकाधारकांना नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्याचे निर्देश जिल्ह्यातील पुरवठा निरीक्षक व पुरवठा निरीक्षण अधिकाºयांना देण्यात आले आहेत.
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी

 

Web Title: Ration card will be audited in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला