एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या शिधापत्रिकांची होणार तपासणी!
By admin | Published: October 14, 2015 01:31 AM2015-10-14T01:31:19+5:302015-10-14T01:31:19+5:30
पांढ-या शिधापत्रिका घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत
अकोला : शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांसोबतच एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळी शिधापत्रिका आहे, अशा कुटुंबांनी त्यांच्याकडील शिधापत्रिका आठ दिवसांत बदलून पांढरी शिधापत्रिका घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी केले आहे. शिधापत्रिकाधारक कुटुंबातील व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय नोकरीवर आहेत, तर त्यांच्याकडे पांढरी शिधापत्रिका असणे नियमानुसार आवश्यक आहे. अशा कुटुंबांनी अद्याप त्यांच्याकडील शिधापत्रिका बदलून घेतली नसेल, तर त्यांनी आठ दिवसांच्या आत बदलून घेत पांढरी शिधापत्रिका घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी केले आहे. शिधापत्रिका तपासणीमध्ये शासकीय किंवा निमशासकीय कर्मचार्यांसोबतच एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांकडे केसरी किंवा पिवळी शिधापत्रिका आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी दिला आहे.