Akola: रेशन दुकानदार म्हणतात, एकच मिशन आमचे कमिशन, अकाेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन
By राजेश शेगोकार | Updated: March 20, 2023 17:48 IST2023-03-20T17:47:48+5:302023-03-20T17:48:06+5:30
Akola News: अकाेला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन व गॅस परवानाधारक संघटनेतर्फे माेफत धान्य वितरणाचे कमिशन द्या या प्रमुख मागणीसाठी साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदोलन करण्यात आले.

Akola: रेशन दुकानदार म्हणतात, एकच मिशन आमचे कमिशन, अकाेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन
- राजेश शेगाेकार
अकाेला : अकाेला जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदाेलन सुरू असतानाच त्यांच्याच बाजुला अकाेला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन व गॅस परवानाधारक संघटनेतर्फे माेफत धान्य वितरणाचे कमिशन द्या या प्रमुख मागणीसाठी साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी रेशन दुकानदारांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ एकच मिशन आमचे कमिशन’, दिलेली घाेषणा चांगलीच चर्चेत आली.
काराेराच्या लाटेपासून सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना सवलतीच्या दरात धान्याचे विवतरण करण्याचे आदेश दिले हाेते. या याेजनेचा लाभ विविध घटकांतील लाभार्थ्यांना झाला. मात्र मागंण्याकडे दूर्लक्ष करण्यात आले. सन २०१७ पासून (तांदुळाचे) शासकीय भरणा केल्यानंतरही धान्य मिमळालेली नाही. या प्रलंबित धान्य न मिळालेले बाळापूर, तेल्हारा, अकोट, पातूर, मुर्तिजापूर तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांचे रिफंडचे पैसे त्वरीत देण्यात यावे. जानेवारी 2023 पासून मोफत धान्य वितरण केलेले आहे; रास्त भाव धान्य दुकानदारांना कमिशन मिळालेले नाही. ते देण्यात यावे मोफत धान्य वितरणाचे कमिशन रक्कम रास्त भाव धान्य दुकानदारांचे बॅक खात्यात दर महिन्याचे ५ तारखेपर्यंत जमा व्हावे अशा मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश शर्मा, महानगराध्यक्ष याेगेश अग्रवाल, सचिव अमाेल सातपुते, माे. आरीफ, जयंत माेहाेळ, कैलास गाेळे, रमाकांत धनस्कार,आकाश वानखडे, शेख जावेद शेख रसूल, दिवाकर, पाटील, एस.व्ही. गुप्ता आदींसह गजानन मजदूर कामगार सहकारी संस्था, महिला शिवकला व उद्याेग प्रशिक्षण, अकाेला फ्रेन्डस साेसायटी आदींचे पदाधिकारी उपस्थित हाेते.