वाहतूक पोलीस रमले पुस्तक वाचनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:11 AM2017-10-14T02:11:17+5:302017-10-14T02:11:43+5:30

शहरातील वाहतुकीचे नियंत्रण करणारे पोलीस शुक्रवारी पुस्तक वाचनामध्ये रमून गेले होते. निमित्त होते, माजी राष्ट्रपती, मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे. वाहतूक पोलिसांनी कलामचाचांचे पुस्तक वाचून त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला. 

Reading the book of traffic police! | वाहतूक पोलीस रमले पुस्तक वाचनात!

वाहतूक पोलीस रमले पुस्तक वाचनात!

googlenewsNext
ठळक मुद्देवाचन प्रेरणा दिन माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील वाहतुकीचे नियंत्रण करणारे पोलीस शुक्रवारी पुस्तक वाचनामध्ये रमून गेले होते. निमित्त होते, माजी राष्ट्रपती, मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे. वाहतूक पोलिसांनी कलामचाचांचे पुस्तक वाचून त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला. 
 बंदोबस्त, रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रण, गुन्हय़ांचा तपास या कामातूनच पोलिसांना वेळ मिळत नाही; परंतु मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी त्यांच्या अतुलनीय कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यांना आदरांजली अर्पित करावी, या उद्देशाने वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांनी थोडा वेळ काढत, पुस्तक वाचनात घालविला. या उपक्रमाचे आयोजन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचार्‍यांनी सकाळी ९ ते १0 या वेळेत कलामचाचांच्या जीवनकार्यावरील पुस्तकांसह कायदेविषयक, ज्ञान वृद्धींगत करणार्‍या पुस्तकांचे वाचन करण्यात आले. शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयामध्ये पोलीस कर्मचार्‍यांसाठी १00 पुस्तके वाचनासाठी ठेवण्यात आली होती. वाहतूक नियंत्रणाच्या कामातून थोडा वेळ काढत, पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी वाचनात मन रमविले आणि कलामचाचांना आगळीवेगळी आदरांजली अर्पित केली.

Web Title: Reading the book of traffic police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.