जीवनात यशस्वितेसाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे - डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:35 AM2017-12-05T02:35:09+5:302017-12-05T02:38:08+5:30

जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहे, वाचनामुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच जीवन जगणे सुलभ होते. अनेक अडचणी, समस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचनाची ही संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. वाचन संस्कृती एक चळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

Reading skills should increase for success in life - Dr. Ranjeet Patil | जीवनात यशस्वितेसाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे - डॉ. रणजित पाटील

जीवनात यशस्वितेसाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे - डॉ. रणजित पाटील

Next
ठळक मुद्देदोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटनअकोल्यातील ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालयात आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहे, वाचनामुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच जीवन जगणे सुलभ होते. अनेक अडचणी, समस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचनाची ही संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. वाचन संस्कृती एक चळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
अकोला येथील सिव्हिल लाइन परिसरातील श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शांताराम बुटे, ग्रंथमित्र प्रा.डॉ. एस.आर. बाहेती, प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रकाश मुकुंद, जिल्हा ग्रंथालय संस्थांचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ, अमरावतीचे सहायक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
वाचन संस्कृती पुढे नेण्यासाठी आज पुस्तकांबरोबरच ई-लायब्ररी उपलब्ध आहे. त्यामुळे माहिती मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाली आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, की वाचन संस्कृती वाढवण्यात सार्वजनिक वाचनालयाचा मोठा वाटा आहे, अशी वाचनालये वाढणे अत्यंत गरजेचे आहे. या वाचनालयांना येणार्‍या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून निश्‍चितपणे प्रयत्न केला जाईल.
यावेळी  बाहेती यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथपाल दीपक गेडाम यांनी केले. संचालन प्रा. गोपाल सुरे यांनी, तर आभार नवल कवडे यांनी केले. यानंतर ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे फीत कापून पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिक स्टॉलला भेट दिली. ग्रंथोत्सवात विविध पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीबरोबरच परिसंवाद, विनोदी एकपात्री कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. याचा लाभ वाचकप्रेमींनी घेण्याचे आवाहन गेडाम यांनी केले आहे. ५ डिसेंबर रोजी दु. ४ वा. ग्रंथोत्सवाचा समारोप व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.

ग्रंथदिंडी ठरले आकर्षण
ग्रंथोत्सवानिमित्त सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. या ग्रंथदिंडीत महिला वारकर्‍यांसोबतच विद्यार्थी, नागरिक मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेली दिंडी अकोलावासीयांसाठी आकर्षण ठरली.

05सीटीसीएल

Web Title: Reading skills should increase for success in life - Dr. Ranjeet Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.