पातूर येथील आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:22+5:302021-08-01T04:18:22+5:30
पातूर : येथील भाजीपाला हर्राशी गुजरीलाइन येथे होत होती. मात्र, प्रशासनाने गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार पेठ परिसरात हर्राशी ...
पातूर : येथील भाजीपाला हर्राशी गुजरीलाइन येथे होत होती. मात्र, प्रशासनाने गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार पेठ परिसरात हर्राशी भरविण्यास तात्पुरती मंजुरी दिली होती. सद्य:स्थितीत येथे भाजीपाल्याची हर्राशी झाल्यानंतर स्वच्छता करण्यात येत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे भाजीपाल्याची हर्राशी इतरत्र भरविण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
हर्राशी झाल्यानंतर भाजीपाला तसाच पडून सडतो; परंतु त्याची विल्हेवाट लावण्याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माॅर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हर्राशीसाठी येणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हर्राशी ही गुरुवार पेठवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे भाजीपाल्याची हर्राशी ही इतरत्र हलविण्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्याधिकारी, तहसीलदार व शिर्ला ग्रा.पं.चे ग्रामसेवक यास दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर सचिन बारोकार, प्रकाश वालोकार, किशोर पोपळघट, संजय गाडगे, मुन्ना पोपळघट, अजय इंगळे, सचिन पोपळघट, अश्विनी गाडगे, सविता बारोकार, विजय पोपळघट, बाळू चतरकर, गीता पोपळघट, ज्योती वालोकार, सुशीलाबाई पोपळघट, दीपाली चतरकार, सोनम पोपळघट, दिलीप इंगळे, गजानन बारोकार, अनिता पोपळघट, ज्योती चाफेकर आदींची स्वाक्षरी आहे.