फलक लावण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी
By admin | Published: December 25, 2015 03:18 AM2015-12-25T03:18:11+5:302015-12-25T03:18:11+5:30
आकोटमधील घटना ; सात जणांना अटक.
आकोट: शहरातील अबकारी प्लॉट येथे २४ डिसेंबर रोजी फलक लावण्याच्या कारणावरून दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारींवरून आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, सात जणांना अटक केली. आकोट शहरातील अबकारी प्लॉट येथे गुरुवारी सकाळी फलक लावण्याच्या कारणावरून रियाजउल्ला खाँ, तनवीरखाँ, तौहीद, शकीलखाँ दाऊदखाँ, शफीक खाँ दाऊदखाँ यांनी चौकामध्ये लोखंडी फलक लावला. त्या कारणावरून वाद झाला असता उपरोक्त लोकांनी तलवार घेऊन फिर्यादी मो.आकील मो.आदील पटेल व त्याचे भावास मारहाण करून जखमी केले. याबाबत मो.आदील यांच्या तक्रारीवरून पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच मो.शफीक पटेल, मो.अकील पटेल, शकील पहेलवान, सै.इर्शाद, इमरान, शकील राणा व ओझोन ग्रुपच्या ६ ते ८ कार्यकर्त्यांनी अबकारी प्लॉट येथील मदीनानगर येथे लोखंडी फलक लावण्याच्या कारणावरून रियाजउल्लाखाँ बिसमील्लाखाँ यांना जखमी केले. या घटनेबाबत रियाजउल्लाखाँ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा आरोपींसह ६ ते ८ ओझोन ग्रुपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गटातील सात आरोपींना अटक केली आहे.