प्रज्ञा शोध शिष्यवृत्तीपात्र १६ विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:29+5:302021-07-20T04:14:29+5:30
हा एक अपूर्व विक्रम आहे. उज्ज्वल यशासाठी स्पर्धा परीक्षांकडे वळणे क्रमप्राप्त असल्याचे प्रतिपादन अनिल गुंजाळ, सहाय्यक आयुक्त यांनी ...
हा एक अपूर्व विक्रम आहे. उज्ज्वल यशासाठी स्पर्धा परीक्षांकडे वळणे क्रमप्राप्त असल्याचे प्रतिपादन अनिल गुंजाळ, सहाय्यक आयुक्त यांनी ध्वनिसंदेशातून केले.
शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला, प्रभात किड्स स्कूल व अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात किड्स येथे शनिवार, दि. १७ जुलै रोजी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा झाला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जीवरसायनशास्त्र स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था अकोल्याचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत कपले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिलीप तायडे लाभले होते, तर अध्यक्षस्थानी प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे हे हाेते. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ यांनी ध्वनिसंदेशातून गुणवंतांचे काैतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे डॉ. रवींद्र भास्कर यांनी केले. प्रभातचे सांस्कृतिक विभागप्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विजय पजई यांनी आभारप्रदर्शन केले.
या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार
या सत्कार सोहळ्यात राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या १६ विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये प्रभात किड्स स्कूलच्या ख्याती नितीन लोया, साहिल राजू वाडकर, तनया भास्कर काकड आणि अर्थव सुधाकर डाबेराव, पोदार इंटरनॅशनल स्कूलचा कुलदीप संदीप ठाकरे, लक्षिता अनुप संतानी आणि यश रामेश्वर चव्हाण, माउंट कारमेल स्कूलचा पार्थ संदीप फडके, अक्षय संदीप पारसकर, अनीश नितीन गावंडे आणि श्रीया मंगेळ तुळसकर, स्कूल ऑफ स्कॉलर्सचा नचिकेत सुरेश महल्ले, ओम अतुल गायकवाड आणि राजनंदिनी महेश मानधने, तर हॉलिक्राॅस कॉन्व्हेंट हायस्कूलचा आदित्य नरेश साहू व ध्रुव शशांक फुरसुले यांचा समावेश होता. तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षक धर्मदीप इंगळे, विजय पजई, विश्वास जढाळ आणि मीता इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.