रेतीघाटांच्या लिलावाचा फज्जा

By Admin | Published: May 19, 2014 11:51 PM2014-05-19T23:51:03+5:302014-05-20T01:15:27+5:30

अकोला जिल्ह्याातील उर्वरित १०४ रेतीघाटांपैकी केवळ तीन रेतीघाटांचा लिलाव.

Reclamation auction fence | रेतीघाटांच्या लिलावाचा फज्जा

रेतीघाटांच्या लिलावाचा फज्जा

googlenewsNext

अकोला: जिल्ह्याातील उर्वरित १०४ रेतीघाटांचा जाहीर फेरलिलाव सोमवार, १८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आला; मात्र या लिलावात केवळ तीन रेतीघाटांचा लिलाव झाला. त्यामधून केवळ ६५ हजार ७५७ रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे पुन्हा एकदा रेतीघाटांच्या लिलावांचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. अकोला जिल्ह्यातील एकूण २५७ रेतीघाटांच्या ऑनलाईन ई-लिलावाची प्रक्रिया गेल्या सप्टेंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली होती. लिलावाच्या पहिल्या चार फेरीत एकूण २५७ पैकी १५२ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. उर्वरित १०४ रेतीघाटांच्या फेरलिलाव सोमवार, १९ मे रोजी आयोजित करण्यात आला होता; मात्र दुपारी ३ वाजेपर्यंत या लिलाव प्रक्रियाच्या ठिकाणी एकही कंत्राटदार फिरकला नाही. त्यानंतर आलेल्या काही कंत्राटदारांच्या उपस्थितीत १०४ पैकी केवळ तीन रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील माटोडा, सालतवाडा आणि तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर या तीन रेतीघाटांचा समावेश आहे.

*१२ कोटीपैकी मिळाले केवळ ६५ लाख!

पाचव्यांदा घेण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत जिल्ह्यातील १०४ रेतीघाटांच्या लिलावतून जिल्हाधिकारी कार्यालयाला १२ कोटींचा महसूल प्राप्त होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र लिलावात तीनच रेतीघाटांचा लिलाव झाल्याने त्यामधून केवळ ६५ हजार ७५७ रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याचे चित्र आहे.

*कंत्राटदरांनी फिरविली पाठ!

जिल्ह्यातील १०४ रेतीघाटांच्या जाहीर लिलावात निर्धारित किमतीपेक्षा २५ टक्के कमी किमतीने रेतीघाटांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असला तरी, या लिलावात बोली बोलण्यासाठी कंत्राटदार फिरकले नाही. कंत्राटदारांनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरविल्याने १०४ पैकी केवळ तीन रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला.

Web Title: Reclamation auction fence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.