पुनर्भरण झालेल्या विहिरींनी गाठला तळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:37 AM2017-09-26T01:37:45+5:302017-09-26T01:37:51+5:30

अकोला : जलयुक्त शिवार अभियानातील विहीर पुनर्भरणातून  जिल्ह्यात किती विहिरींची पातळी वाढली, त्याचा शेतकर्‍यांना  कसा उपयोग झाला, या परिणामाची माहितीच उपलब्ध नाही.  विशेष म्हणजे, विहिरी पुनर्भरण झालेल्या कामांची पाहणी केली  असता, त्यातील अनेक खड्डे बुजले आहेत. तर पाइपचाही  जागेवर पत्ताच नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळ त आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात हजारो विहिरींचे पुनर्भरण  झाले, त्या कामांचा कसा बोजवारा उडाला आहे.

Reclamation well reached the bottom! | पुनर्भरण झालेल्या विहिरींनी गाठला तळ!

पुनर्भरण झालेल्या विहिरींनी गाठला तळ!

googlenewsNext
ठळक मुद्देपुनर्भरणाच्या उपाययोजनांचे खड्डेही बुजलेअभियानात पुनर्भरणाची सर्वाधिक कामे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जलयुक्त शिवार अभियानातील विहीर पुनर्भरणातून  जिल्ह्यात किती विहिरींची पातळी वाढली, त्याचा शेतकर्‍यांना  कसा उपयोग झाला, या परिणामाची माहितीच उपलब्ध नाही.  विशेष म्हणजे, विहिरी पुनर्भरण झालेल्या कामांची पाहणी केली  असता, त्यातील अनेक खड्डे बुजले आहेत. तर पाइपचाही  जागेवर पत्ताच नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळ त आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात हजारो विहिरींचे पुनर्भरण  झाले, त्या कामांचा कसा बोजवारा उडाला आहे.
शासनाने सिंचन सुविधा वाढवणे, पावसाचे पाणी जमिनीत  मुरवणे, यासाठी राज्यात सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना  कशी फसवी आहे, याचे अनेक उदाहरणे आता पुढे येत आहेत.  अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या अनेक उपक्रमांमध्ये  विहीर पुनर्भरण हा उपाय आहे. त्यातून कोरड्या झालेल्या  विहिरीत बाह्यस्रोतातून पावसाचे पाणी सोडले जाते. ते पाणी  जमिनीत मुरल्याने पाणी पातळी वाढते. न जिरलेले पाणी विहिरी त साठवून राहते. मात्र, हा प्रयोग यशस्वी झालेल्या विहिरींची सं ख्या अल्प आहे. अकोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहीर  पुनर्भरण केलेल्या जागेवर आता काहीच नाही. विहिरीत पाणी  नाही. स्रोतातून ते झिरपले की नाही, याची कुठलीही माहिती  नाही. त्यामुळे आधी ही उपाययोजना झालेल्या विहिरींची पाहणी  करून या उपक्रमांची फलनिष्पत्ती तपासण्याची वेळ आली  आहे.

Web Title: Reclamation well reached the bottom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.