पदांअभावी रखडली ‘पीजी’ अभ्यासक्रमाची मान्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:20 AM2021-01-19T04:20:55+5:302021-01-19T04:20:55+5:30
या पदांना नाही मंजुरी सर्जरी ॲनेस्थिशिया पेडिॲट्रिक मेडिसिन या सात विषयांना पदांअभावी मान्यता नाही औषध वैद्यकशास्त्र शल्यचिकित्साशास्त्र अस्थिव्यंगोपचारशास्त्र मनोविकृतीशास्त्र ...
या पदांना नाही मंजुरी
सर्जरी
ॲनेस्थिशिया
पेडिॲट्रिक
मेडिसिन
या सात विषयांना पदांअभावी मान्यता नाही
औषध वैद्यकशास्त्र
शल्यचिकित्साशास्त्र
अस्थिव्यंगोपचारशास्त्र
मनोविकृतीशास्त्र
बधिरीकरणशास्त्र
क्ष-किरणशास्त्र
बालरोगशास्त्र
जिल्हा स्त्री रुग्णालयातही प्राध्यापक नाही
बालरोगशास्त्र विषयाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मान्यता मिळावी म्हणून जिल्हा स्त्री रुग्णालयाची मदत घेणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या विचाराधीन हाेते. मात्र, या विषयात जिल्हा स्त्री रुग्णालयातही प्राध्यापकांची पदे नसल्याने जीएमसी प्रशासन जिल्हा स्त्री रुग्णालयाची मदत घेऊ शकले नाही.
आतापर्यंत १३ विषयांना मिळाली मान्यता
शरीरशास्त्र, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र, शरीरविज्ञान, जीवरसायनशास्त्र, फॅरेन्सिक, मेडिसिन ॲन्ड टेक्सोलॉजी, औषधविज्ञान, पॅथॉलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र, पीएसएम, क्षयरोग आणि छातीरोग, नेत्रविज्ञान, नाक-कान-घसा व त्वाचारोग आदी विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे.
बालरोगशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एमसीआयकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, त्यासाठी आवश्यक पदांना अकोला जीएमसीत पदांना मंजुरी नसल्याने सध्या मान्यता मिळू शकली नाही. पदांना मान्यता मिळाल्यास या विषयातही महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होईल.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी