पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधनांना मान्यता
By admin | Published: June 5, 2017 01:57 AM2017-06-05T01:57:42+5:302017-06-05T01:57:42+5:30
संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची मोहोर: दहा पीक वाणासह पाच यंत्राचा समावेश
अकोला: डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधनास परभणी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीत मान्यता प्रदान करण्यात आली. या मध्ये कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या दहा पीक वाणासह पाच कृषी यंत्र तथा ५४ विविध राज्यातील शेतकर्यांच्या सेवेत सादर केल्या.
राज्यातील शेती समृद्ध आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी राज्यांतर्गत चारही कृषी विद्यापीठे आपली सर्वोत्तम कामगिरी बजावीत असतात. राज्यातील प्रत्येक विभागातील जमिनीचा, हवामानाचा, बाजारपेठांचा सारासार अभ्यास करीत बदलत्या जागतिक परिस्थितीला अनुसरून सुधारित पीक पद्धती, पीक वाणाची निर्मिती, लहान, मध्यम आणि मोठय़ा शेतकर्यांना उपयुक्त यंत्रे व अवजारांची निर्मिती, शेतीपयोगी विविध शिफारशी कृषी विद्यापीठे दरवर्षी प्रसारित करीत असतात. विद्यापीठांनी केलेले संधोधन शेतक र्यांच्या बांधावर पोहोचण्यापूर्वी त्याची विविध टप्प्यांवर चाचणी होत शेवटी राज्यातील चारही विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीत सर्व संबंधित कृषी शास्त्रज्ञाच्या उपस्थितीत होत असते.
स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीतमध्ये डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दहा प्रमुख पीक वाण, पाच यंत्रे व अवजारे आणि तब्बल ५४ विविध शिफारशी राज्यातील शेतकर्यांच्या सेवेत सादर केल्या. यामध्ये हरभरा पिकाची एकेजी -११0९ हुरड्यासाठी ज्वारीचे वाण १0३ (पीडीकेव्ही कार्तिकी) वाणाचा समावेश आहे.
पूर्व विदभार्तील साकोली येथील संशोधन केंद्राद्वारे अधिक उत्पादन देणारे (३८ ते ४0 क्विंटल प्रती हेक्टरी) भाताचे साकोली -९ (एसकेएल -२-५0-५६-४५-३0-६0) या १३0 ते १३५ दिवसात तयार होणार्या वाणाचा सामावेश आहे. याशिवाय तेलबिया संशोधन विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या भुईमुगाच्या एके- ३३५ या वाणाचा समावेश आहे.
यंत्र अवजारे प्रसारणामध्ये सुद्धा विद्यापीठाने समाधानकारक कामगिरी करीत छोटे टॅक्टर चलित डवरणी यंत्र, मनुष्यचलीत रोप लावणी यंत्र, एकात्मिक पंकृवी मिनिदाल संयंत्र, व हिरव्या हरभर्याचे गाठे तोडणी यंत्र तथा मुंग साल काढणी यंत्राचा समावेश आहे.
यासह नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन, उद्यानविद्या, मुलभूत शास्त्रे, अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान, पिक संरक्षण, कृषी अभियांत्रिकी, सामाजिकशास्त्र, जैविक आणि अजैविक ताण सहन करणारे स्त्रोत नोंदणी प्रस्ताव व उपयुक्त सूक्ष्मजीव समिती अंतर्गत एकूण ५४ विविध शिफारशी मंजूर करण्यात आल्या.
वैदर्भीय शेती संपन्न होण्यासाठी कार्यरत डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या शिरोपेचात या संशोधनात्मक उपलब्धींमुळे अजून एक तुरा खोवण्यात शास्त्रज्ञांना यश प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या कृषी विषयक उपलब्धीचा शेतकरी वगार्नी अधिकाधिक फायदा घ्यावा व शेती विषयक प्रत्येक समस्येचे निराकरण करीत शेती अधिक फायदेशीर करावी असे आवाहन सुद्धा विद्यापीठाचे वतीने करण्यात येत आहे.
अकोला लिंबू- ३, भेंडीच्या एकेओव्ही- १0७, मिरचीचे एकेसी-४0६ या ४८ क्विंटल उत्पादन देणार्या, एकेजीआयएल- एसईएल- 0३ -१२ (पीडीकेव्ही रोशनी) या आकर्षक रंगाच्या, जास्त फुले देणार्या वाणाचा व शेवंतीच्या पीडीकेव्ही बिजलीसुपर या आकर्षक (अधिक पाकळ्यांची वलय असणार्या) पांढर्या रंगाची मोठी फुले, अधिक पसारा असलेली बुटके झाड व अधिक उत्पादन देणार्या वाणांचा सामावेश आहे.