गुरुबानी लुटमारप्रकरणातील सहा आरोपींची ओळखपरेड
By admin | Published: October 9, 2015 01:46 AM2015-10-09T01:46:48+5:302015-10-09T01:46:48+5:30
सहा आरोपींची गुरुवारी दुपारी जिल्हा कारागृहामध्ये तहसीलदार पूजा माटोडे यांनी ओळखपरेड घेतली.
अकोला: धर्मेश व सुनील गुरुबानी यांना लुटमार करून त्यांच्याकडील १२ लाख रुपयांची रोकड पळविणार्या सहा आरोपींची गुरुवारी दुपारी जिल्हा कारागृहामध्ये तहसीलदार पूजा माटोडे यांनी ओळखपरेड घेतली. कोठडी बाजारातील व्यापारी धर्मेश गुरुबानी हे १0 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मोटारसायकलवर १२ लाख रुपयांची रोकड घेऊन जात असताना, आठ ते दहा युवकांनी त्यांना विद्यानगर परिसरात अडवून लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्याकडील रोकड पळवून नेली होती. याप्रकरणी खदान पोलिसांनी जलदगतीने तपास करून दुसर्याच दिवशी मुख्य सूत्रधारांना अटक केली होती. लुटमार प्रकरणातील आरोपी चेतन मारोती डिवरे, अनुप देशमुख, अमित अंबादास काळे, उमेश रामरतन धुर्वे, विशाल उर्फ विक्की राजेंद्र बुंदेले हे सध्या कारागृहात आहेत. त्यांची ओळखपरेड करायची असल्याने, खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे यांनी न्यायालयाकडून परवानगी मागितली होती. न्यायालयाने ओळखपरेड करण्याची परवानगी दिल्यानंतर गुरुवारी तक्रारकर्ते धर्मेंंंद्र गुरुबानी व सुनील गुरुबानी यांच्याकडून तहसीलदार पूजा माटोडे यांनी आरोपींची ओळखपरेड केली. यावेळी ठाणेदार इंगळे उपस्थित होते.