बोंडअळीच्या नियंत्रणासाठी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सुचविल्या उपाययोजना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:16 PM2018-08-12T15:16:27+5:302018-08-12T15:17:39+5:30
शिर्ला येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पास्टुल येथे बोंडअळीच्या कार्यशाळा घेऊन शेतकºयांना बोंडअळी नियंत्रणासाठी उपाययोजना सुचविल्या.
अकोला: गतवर्षी गुलाबी बोंडअळीने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले कपाशीचे पीक नष्ट केले. शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यंदासुद्धा गुलाबी बोंडअळीने कपाशीवर आक्रमण केले आहे. बोंडअळीच्या संकटातून शेतकºयांनी मुक्तता व्हावी, या उद्देशाने शिर्ला येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पास्टुल येथे बोंडअळीच्या कार्यशाळा घेऊन शेतकºयांना बोंडअळी नियंत्रणासाठी उपाययोजना सुचविल्या.
कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पास्टुल येथील शेतकºयांना गुलाबी बोंडअळी फवारणीची माहिती दिली आणि कपाशीच्या एका हेक्टर क्षेत्रामध्ये १0 ते १२ कामगंध सापळे लावावेत. सर्वेक्षण कलन गरजेनुसार शेतकºयांनी कीटकनाशके, संजीवके, अन्नद्रव्ये यांचे मिश्रण न करता, वेगवेगळ्या पद्धतीने कपाशीवर फवारणी करावी. गावस्तरावर एकाच वेळी उपाययोजना केल्यास बोंडअळीवर नियंत्रण मिळविणे सहज शक्य होईल, असे मार्गदर्शन केले.
बोंडअळी नियंत्रण कार्यशाळेला पास्टुलचे सरपंच विष्णू घुगे, कृषिसेवक डिगांबर नीळकंठ, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खरडे, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. श्रीकांत पाटील, समन्वयक प्रा. आरती देशमुख, कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, प्रा. विक्रम गोरे, कृषिदूत शुभम काळे, कुशाल राऊत यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)