वीज देयकांची १०० टक्के वसुली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:24 AM2021-02-17T04:24:41+5:302021-02-17T04:24:41+5:30

नागपूर प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सुहास रंगारी यांनी मंगळवारी सर्व परिमंडळांचा सविस्तर आढावा घेतला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय ...

Recover 100% of electricity bills | वीज देयकांची १०० टक्के वसुली करा

वीज देयकांची १०० टक्के वसुली करा

Next

नागपूर प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सुहास रंगारी यांनी मंगळवारी सर्व परिमंडळांचा सविस्तर आढावा घेतला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्वच वर्गवारीतील थकबाकी १०० टक्के वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १०० टक्के वसुलीसाठी नागपूर प्रादेशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता दौरे काढावेत, मेळावे आयोजित करावेत, ग्राहकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना वीज बिल भरण्यासाठी प्रोत्साहित करावे, महाकृषी ऊर्जा धोरणाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी; तसेच या धोरणांतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी व भरघोस सवलतीची माहिती देऊन त्यांना थकबाकीमुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत यासह वीज वितरण हानी कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना करावी, असे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले.

या बैठकीत अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अमरावती परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप खानंदे, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, उपमहाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) प्रमोद खुळे सर्व परिमंडळांचे अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

Web Title: Recover 100% of electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.