एसआरपीएफ, बॅड्समन, कारागृहसोबतच पोलिस दलाची भरती एकाच दिवशी!

By नितिन गव्हाळे | Published: June 17, 2024 10:46 PM2024-06-17T22:46:07+5:302024-06-17T22:46:41+5:30

शेकडो विद्यार्थ्यांचे खासदार धोत्रेंना निवेदन, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर घातली समस्या

Recruitment of police force along with SRPF, Badsman, Jail on the same day! | एसआरपीएफ, बॅड्समन, कारागृहसोबतच पोलिस दलाची भरती एकाच दिवशी!

एसआरपीएफ, बॅड्समन, कारागृहसोबतच पोलिस दलाची भरती एकाच दिवशी!

अकोला : एसआरपीएफ, बॅड्समन, कारागृह पोलिस आणि पोलिस दलाची भरती एकाच दिवशी आणि एकाच तारखेला होत असल्याने विद्यार्थ्यांना काही भरतीच्या प्रवेशाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या विभागांच्या भरतीची तारीख बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे १६ जून रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी खासदार धोत्रे, आमदार सावरकर यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांसोबत मोबाइलवर संपर्क साधून चर्चा केली आणि विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या.

वेगवेगळ्या विभागाच्या पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना १४ जून रोजी महाराष्ट्र पोलिस भरतीचे मैदानी चाचणी प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे; परंतु याचदरम्यान जिल्हा पोलिस, चालक पोलिस, राज्य राखीव पोलिस बल, बॅड्समन व कारागृह पोलिस या सर्व घटकांची मैदानी चाचणी एकाच वेळेस सुरू होत असल्याने उमेदवारांना एकाच दिवशी सर्व ठिकाणी उपस्थित राहता येत नसल्याने त्यांचे नुकसान होणार आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला पूर्ण एक दिवसाचा कालावधी हा प्रवासात जाणार असल्याने मैदानी चाचणींच्या तारखा बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पोलिस महासंचालक तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या व्यथा व समस्या आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांनी मांडल्या व त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

वेगवेगळ्या विभागांतील जागांसाठी भरले अर्ज
विद्यार्थ्यांनी दोन ठिकाणी फॉर्म भरल्यामुळे एका दिवशी परीक्षा होत असल्याने अडचणीचे ठरणार आहे. या संदर्भात खासदार धोत्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंगळवारी यासंदर्भात परीक्षा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी घेण्याचे निर्देश देण्यात येतील, असे अभिवचन दिले आहे.
 

Web Title: Recruitment of police force along with SRPF, Badsman, Jail on the same day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस