पावसाचा पुन्हा खंड; खरिपाची पिके संकटात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:22 AM2021-08-14T04:22:57+5:302021-08-14T04:22:57+5:30
जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ४,८३,२९१ हेक्टर आतापर्यंत झालेला पाऊस ४२३.४ मिमी पिके फुलधारणेच्या अवस्थेत जिल्ह्यातील सोयाबीनची पिके फुलधारणेच्या अवस्थेत आहेत. ...
जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र
४,८३,२९१ हेक्टर
आतापर्यंत झालेला पाऊस
४२३.४ मिमी
पिके फुलधारणेच्या अवस्थेत
जिल्ह्यातील सोयाबीनची पिके फुलधारणेच्या अवस्थेत आहेत. तसेच सुरुवातीची पेरणी झालेल्या कपाशीलाही बोंड तयार होत आहे. या पिकांना पाण्याची खूप गरज आहे; परंतु काही दिवसांपासून पाऊस नसल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. तसेच सोयाबीनची फुलेही गळून पडण्याची शक्यता आहे.
पिकांना सिंचनाचा आधार!
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पिके संकटात आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पिकांना सिंचन करण्यास सुरुवात केली आहे; मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन उपलब्ध नाही, त्या शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास हंगाम संकटात येऊ शकतो.
ऑगस्टमध्ये केवळ २१.३ मिमी पाऊस
जून, जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात दमदार ४०२ मिमी पाऊस झाला; मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात केवळ २१.३ मिमी म्हणजेच २३.६ टक्के पाऊस झाला. चार-पाच दिवसांत तुरळक ठिकाणीही पावसाच्या सरी बरसल्या नसल्याची नोंद आहे.