लाल कार्डधारक गावांना ‘अल्टिमेटम!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:08 AM2017-08-03T02:08:50+5:302017-08-03T02:09:15+5:30
अकोला: गावातील स्रोतांतून धोक्याचा पाणीपुरवठा होत आहे. त्यातून जलजन्य आजाराची साथ पसरल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिला आहे. त्या पाण्याच्या स्रोतांची गुणवत्ता वाढ करण्याचेही नोटिसमध्ये बजावण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गावातील स्रोतांतून धोक्याचा पाणीपुरवठा होत आहे. त्यातून जलजन्य आजाराची साथ पसरल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिला आहे. त्या पाण्याच्या स्रोतांची गुणवत्ता वाढ करण्याचेही नोटिसमध्ये बजावण्यात आले आहे.
गावातील पाणी स्रोतांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने केले आहे. त्यानुसार काही स्रोतांतून धोकादायक पातळीवर पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यापैकी काही तीव्र तर काही मध्यम स्वरूपातील धोक्याचे आहेत. त्या स्रोतांसाठी ग्रामपंचायतींना लाल कार्ड वाटप करण्यात आले. ज्या स्रोतांचा जोखीमस्तर निश्चित झाला. त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून ती जोखीम कमी करण्याचेही बजावण्यात आले. सध्या पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजारांची साथ पसरू शकते, ही शक्यता गृहित धरता ग्रामपंचायतींनी आवश्यक उपाययोजना करण्याचेही सांगण्यात आले. लाल कार्डधारक गावांनी स्रोतांचा जोखीमस्तर कमी केल्याचा अहवाल गटविकास अधिकार्यांमार्फत मागवण्यात आला आहे.
लाल कार्डसाठी पात्र स्रोत
ज्या ग्रामपंचायतींमध्ये पाणी शुद्धीकरण अनियमित होते. पाणी स्रोतांचा परिसर अस्वच्छ असणे, नळ गळत्या, व्हॉल्व्ह गळत्या असणे, ग्रामपंचायतींमध्ये टीसीएल पावडर उपलब्ध नाही. वर्षभरात जलजन्य साथरोगांचा उद्रेक झाला आहे, त्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जाते. गावांमध्ये अस्वच्छता असलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाते. लाल आणि पिवळ्य़ा कार्डसाठी असलेले दोष नसलेल्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते.
आठ ग्रामपंचायतींना नोटिस
जिल्हय़ातील लाल कार्ड असलेल्या ८ ग्रामपंचायतींना नोटिस देण्यात आल्या. त्यामध्ये बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा, लोहगड (धाबा- उद्रेकाचे गाव), घोटा-उद्रेकाचे गाव, अकोला तालुक्यातील दोनवाडा, अकोट तालुक्यातील वरूर विटाळी-उद्रेकाचे गाव, पातूर तालुक्यातील चोंढी, मूर्तिजापूर तालुक्यातील गाजीपूर-उद्रेकाचे गाव या गावांचा समावेश आहे.