शेतकऱ्यांना लाल तांदळाचे आकर्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:57 AM2019-12-31T10:57:42+5:302019-12-31T10:57:53+5:30

पश्चिम विदर्भातही नवे तंत्रज्ञान वापरू न कृषी विद्यापीठातर्फे प्रथमच धान पिकाचा प्रयोग करण्यात आला आहे.

Red rice attracts farmers! | शेतकऱ्यांना लाल तांदळाचे आकर्षण!

शेतकऱ्यांना लाल तांदळाचे आकर्षण!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लाल तांदळाचे वाण विकसित केले असून, औषध गुणधर्म असलेल्या तांदळाला चांगलीच पसंती मिळत आहे. पश्चिम विदर्भातही नवे तंत्रज्ञान वापरू न कृषी विद्यापीठातर्फे प्रथमच धान पिकाचा प्रयोग करण्यात आला आहे. धानाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनही देत आहे.याच अनुषंगाने अकोल्यातील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात दर्शनी भागात ठेवलेला लाल तांदुळ शेतकºयांचे आकर्षण ठरला.
धान पिकाचे विदर्भात ७ लाख हेक्टर क्षेत्र आहे. पूर्व विदर्भात सर्वाधिक धान पीक घेतले जाते. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या धान संशोधन केंद्राने तांदळाच्या विविध वाणांवर संशोधन केले असून, आता साकोली रेड राईस-१ या नावाने लाल तांदूळ विकसित केला आहे. जास्त २६ आणि लोहाचे प्रमाण १५ माइक्रो असलेल्या लाल तांदळाचे हेक्टरी ४० ते ४२ क्ंिवटल उत्पादन मिळत असल्याचा दावा कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ.जी.आर. श्यामकुवर यांनी केला. अकोल्याच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात हे वाण ठेवण्यात आले होते. पश्चिम विदर्भातील शेतकºयांनी लाल तांदळाची माहिती व पेरणी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती.
पारंपरिक पिकासोबतच पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात (धान) तांदूळ पिकाचा प्रयोग करण्यात येत आहे. कृषी विद्यापीठाच्या एमएससी व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांनी दर्यापूर व अकोेट तालुक्यात पेरीव धानाची पेरणी केली आहे. पेरणी यशस्वी होताना दिसत असून,आणखी एकदा हा पेरणी प्रयोग घेतल्यानंतर निष्कर्ष काढण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भात कापूस,सोयाबीन,तूर आदी पिके घेतली जातात.आता नवीन प्रयोग करण्याचा कृषी विद्यापीठाचा प्रयत्न आहे. म्हणूनच कृषी विद्यापीठाने हा पेरणी प्रयोग सुरू ठेवला आहे. यावर पीएच.डी., एमएस्सीचे विद्यार्थी काम करीत आहेत.

लाल तांदळात जस्त व लोहाचे प्रमाण असून,या तांदळात हे औषध गुणधर्म आहेत. पश्चिम विदर्भातही तांदळाचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न असून,प्रयोग करण्यात येत आहेत.याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.म्हणूनच प्रदर्शनात ठेवलेल्या लाल तांदळाचे शेतकºयांना आकर्षण वाटत होते.
- डॉ. विलास भाले, कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

Web Title: Red rice attracts farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.