डिझेल चोरीतील आराेपीची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:25 AM2021-08-18T04:25:09+5:302021-08-18T04:25:09+5:30
जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील इम्रान खान फिरोज खान आणि युसुफ खान अयुब खान यांना डिझेलचाेरी प्रकरणात आरोपी ...
जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील इम्रान खान फिरोज खान आणि युसुफ खान अयुब खान यांना डिझेलचाेरी प्रकरणात आरोपी करीत कलम ३,७ प्रमाणे ईसी ॲक्टनुसार जुने शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
या प्रकरणात दोषारोप पत्र विद्यमान मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले हाेते. या प्रकरणात न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले त्यामधील दाेन पंच फितूर झाले, तर चार साक्षीदारांनी सरकार पक्षाच्या बाजूने साक्ष दिली. या प्रकरणात ॲड. अजय लाेंढे यांनी उलट तपास करताना दाेषाराेपपत्रामध्ये एकही सामान्य साक्षीदार दाखविला नसल्याचे तसेच छापा करण्याचे अधिकार कर्मचाऱ्यास नसून पाेलीस अधिकाऱ्यास असल्याचा युक्तिवाद केला. तसेच कंपनीच्या वाहनचालकास आराेपी बनविले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. इम्रान खान फिरोज खान आणि युसूफ खान अयुब खान यांच्याविरुद्ध एकही सबळ पुरावे नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एम. बैस यांनी दाेन्ही आराेपींची निर्दाेष सुटका केली.