लालपरी असुरक्षित ; अग्निशमन यंत्र गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:35 AM2021-02-21T04:35:46+5:302021-02-21T04:35:46+5:30

एसटीची बाहेरूनच नव्हे, तर आतूनही दुरवस्था : अनेक बसेसचे आसनही तुटलेलेच लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : अलीकडे राज्यात एसटी ...

Redhead insecure; Fire extinguisher disappears! | लालपरी असुरक्षित ; अग्निशमन यंत्र गायब !

लालपरी असुरक्षित ; अग्निशमन यंत्र गायब !

Next

एसटीची बाहेरूनच नव्हे, तर आतूनही दुरवस्था : अनेक बसेसचे आसनही तुटलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : अलीकडे राज्यात एसटी बसेसना आग लागल्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बसस्थानक व आगारामध्ये बसेसची पाहणी केली असता एसटीची बाहेरूनच नव्हे, तर आतूनही दुरवस्था झाल्याचे दिसून आले. अनेक एसटी बसमधील अग्निशमन यंत्र गायब असल्याने लालपरी असुरक्षित असल्याचा प्रकार समोर येत आहे.

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली. मात्र, खिळखिळ्या झालेल्या बसेस, सोयी-सुविधांच्या अभावामुळे आता लालपरीतील प्रवास असुरक्षित ठरू लागला आहे.

महामंडळाच्या बसेसमध्ये असलेली अग्निशमन यंत्रेही बेपत्ता झाली असून याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे चित्र आहे. आता काही दिवसांनी उन्हाळा सुरू होणार असून उन्हाचा पारा वाढत जाऊन आगीच्या घटनांत वाढ होतात. जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात. त्यामुळे बसेसमध्ये अग्निशमन यंत्राची सुविधा आहे की नाही, याबाबत बसेसची पाहणी केली असता अनेक बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याचे दिसून आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धगेवर प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन यंत्र बसविण्याची गरज आहे.

एसटीची आतून दुरवस्था

बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या दोन एसटींची पाहणी केली असता आतून दुरवस्था झाल्याचे दिसून आले. यातील काही बसेसचे तर आसनच तुटलेले होते. काहींच्या खिडक्या तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. बसेसचे आसन तुटलेले व खाली पडलेले होते.

वायफाय सुविधा नावालाच

अँड्रॉईड मोबाईलच्या युगात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मनोरंजन व्हावे, याकरिता प्रत्येक बसेसमध्ये वायफाय यंत्रणा बसविण्यात आली होती. याचे कंत्राट एका खासगी कंपनीकडे होते. परंतु, वर्षभरातच यंत्रणेचा बोजवारा उडाला. बसेसमधील ही सुविधा बंद झाली आहे.

प्रथमोपचार पेट्या गायब

लालपरीमध्ये प्रवास करीत असताना कुठे अपघात झाला तर प्रवाशांसह चालक-वाहकांवर प्रथमोपचार करण्यासाठी चालकाच्या कॅबिनमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविल्या होत्या. त्या पेट्याही एसटी बसमधून गायब झाल्या आहेत. तसेच त्यातील साहित्य बेपत्ता झाल्याचे दिसून आले.

Web Title: Redhead insecure; Fire extinguisher disappears!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.